Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईचा दुहेरी फटका, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ एलपीजी सिलिंडरचीही दरवाढ

महागाईचा दुहेरी फटका, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ एलपीजी सिलिंडरचीही दरवाढ

Petrol Diesel Cylinder price hike : काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरानं गाठली शंभरी, एलपीजी सिलिंडरचीही मोठी दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 10:33 AM2021-02-15T10:33:54+5:302021-02-15T10:36:57+5:30

Petrol Diesel Cylinder price hike : काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरानं गाठली शंभरी, एलपीजी सिलिंडरचीही मोठी दरवाढ

lpg cylinder petrol diesel price today rise delhi mumbai crude record high know new rates | महागाईचा दुहेरी फटका, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ एलपीजी सिलिंडरचीही दरवाढ

महागाईचा दुहेरी फटका, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ एलपीजी सिलिंडरचीही दरवाढ

Highlightsकाही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरानं गाठली शंभरीएलपीजी सिलिंडरचीही मोठी दरवाढ

नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांना महागाईचा दुहेरी फटका बसला आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रूपयांची वाढ झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता विनाअनुदानित १४.२ किलोच्या घरघुती वापराच्या सिलिंडरची किंमत ७६९ रूपयांवर गेली आहे. यापूर्वी हे दर ७१९ रुपये इतके होते. आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. दुसरीकडे पेट्रोलचे दिल्लीतरील दर ८९ रूपयांच्या जवळ तर मुंबईत पेट्रोलचे दर ९५ रूपयांच्या वर गेले आहेत. 

आठवड्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली. दिल्लीत आता पेट्रोलचे दर ८९ रूपयांच्या जवळ पोहोचले आहे. इतकंच नाही दर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं ९९ रूपयांचा तर काही ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरीही पार केली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ होताना आता दिसत आहे, भारतात पेट्रोलियम पदार्थांची किंमत भारतीय बास्केटमध्ये येणाऱ्या ज्या कच्च्या तेलावर अवलंबून आहे त्यावर दराचा परिणाम २० ते २५ दिवसांनंतर दिसतो. 

हे आहेत प्रमुख शहरांतील दर

सोमवारी झालेल्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ८८.९९ रूपये आणि ७९.३५ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९५.४६ रूपये, डिझेलचे दर ८६.३४ रूपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर ९१.१९ रूपये आणि डिझेलचे दर ८४.४४ रूपये, कोलकात्यात ९०.२५ रूपये आणि डिझेलचे दर ८२.९४ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात जवळपास १८ रूपयांची वाढ झाली आहे.

Web Title: lpg cylinder petrol diesel price today rise delhi mumbai crude record high know new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.