पेट्रोल, डिझेलचे दर कमी झालेले असले तरी गॅस सिलिंडरच्या किंमती काही कमी होण्याचे नाव घेत नाहीएत. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढू लागल्याने देशातील गॅस सिलिंडरच्या किंमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG च्या किंमतींचा आढावा घेऊन त्या ठरविल्या जातात. यामुळे उद्या घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
उद्यापासून बँका, पोस्ट आदींचे नियम बदलणार आहेत. उद्या जर दर वाढले तर कमी किंमतीमध्ये गॅस सिलिंडर बुक करण्याचा आजचाच शेवटचा दिवस असेल. मे महिन्यात दोनवेळा गॅसच्या दरात वाढ झाली होती. पहिल्या तारखेला ५० रुपयांनी गॅसचे दर वाढले होते. तर १९ मे रोजी कंपन्यांनी काही रुपयांनी दर वाढविले होते. ३.५० रुपयांनी सिलिंडरचे दर वाढविले होते.
सध्या दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १००३ रुपये आहे. मुंबईत १००५ रुपये, कोलकातामध्ये १०२९ रुपये आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन घेतलेल्यांसाठी २०० रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे. यामुळे त्यांना हा सिलिंडर ८०० रुपयांना मिळणार आहे.