Join us  

LPG Cylinder : महागाईतून दिलासा, ११५ रुपये स्वस्त झाला एलपीजी सिलिंडर, पाहा नवी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 7:35 AM

LPG Cylinder : १ नोव्हेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली.

LPG Cylinder : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या किंमतीत थोडासा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारनं एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. सरकारनं कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात ही कपात केली आहे. १ नोव्हेंबरपासून १९ किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात ११५.५० रूपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु घरगुती सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. ६ जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

दिल्लीत इंडेनच्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे नवे दर १७४४ रूपये झाले आहे. यापूर्वी १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरसाठी १८५९.५० रूपये मोजावे लागत होते. चेन्नईत कमर्शिअल एलपीजी सिलिंडर यापूर्वी २००९.५० रूपयांना मिळत होता. दर कपातीनंतर याची किंमत आता १८९३ रूपये झाली आहे. तर कोलकात्यात एलपीजी सिलिंडर आता १९९५.५० रूपयांना मिळणार आहे.

दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. कोलकात्यात घरगुती सिलिंडरची किंमत १०७९ रूपये, चेन्नईत १०६८.५० रूपये आणि मुंबईत १०५२ रूपयांना मिळतो. देशातील गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला १४ किलोच्या घरगुती आणि १९ किलोंच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करत असतात. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात २५.५ रूपयांची कपात केली होती.   

टॅग्स :गॅस सिलेंडरमुंबई