मुंबई - मागच्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांच्या किचनमधील बजेट बिघडले आहे. (LPG Gas Cylinder price )अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत २०२१ मध्ये आतापर्यंत २२५ रुपयांनी वाढली आहे. राजधानी दिल्लीचा विचार केल्यास येथे १४.२ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजीची किंमत ८१९ रुपयांवर पोहोचली आहे. मात्र या महागाईत पेटीएमने (Paytm) तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. त्यामुळे तुम्हाला ८०० रुपयांचा कॅशबॅक मिळू शकणार आहे. (Big offer! Gas cylinder of Rs 819 for only Rs 19, take advantage of this offer on Paytm)
तुम्ही पेटीएमवरून गॅस सिलेंडर बुक करून ८०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. देशाच्या बहुतांश भागात एलपीजी सिलेंडरची सब्सिडीनंतरची किंमत ८१९ रुपये आहे. अशा परिस्थितीत पेटीएमच्या खास कॅशबॅकडा फायदा उठवून तुम्ही गॅस सिलेंडर केवळ १९ रुपयांत खरेदी करू शकता.
असा घेता येईल ऑपरचा लाभ
- या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्या फोनमध्ये पेटीएम अॅप नसल्यास ते अॅप डाऊनलोड करून घ्या.
- त्यानंतर फोनमध्ये हे अॅप ओपन करा
- त्यानंतर recharge and pay bills या पर्यायावर जा
- आता book a cylinder हा पर्याय निवडा
- त्यातून तुमच्या गॅस पुरवठादार कंपनीचा पर्याय निवडा
- त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा आपल्या एलपीजी आयडीची नोंद करा
- त्यानंतर तुमचा पेमेंट ऑप्शन दिसेल
- आता पेमेंट करण्यापूर्वी पहिल्या ऑफरवर 'FIRSTLPG' हा प्रोमो कोट टाका
Get up to ₹800 cashback while booking your #Indane LPG refill on @Paytm. Book now: https://t.co/ppQr6a97In
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) April 22, 2021
Terms & Conditions Apply #LPGBookingpic.twitter.com/7YLyEBOKnP
७०० रुपयांपर्यंतची ही कॅशबॅक ऑफर ३० एप्रिल २०२१ पर्यंत वैध आहे. हा कॅशबॅक पेटीएम अॅपच्या माध्यमातून पहिल्यांदाच एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहांना मिळणार आहे. बुकिंग केल्यानंतर २४ तासांच्या आत तुम्हाला स्क्रॅचकार्ड मिळेल. या स्क्रॅचकार्डचा वापर ७ दिवसांच्या आत करावा लागेल.