Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gas Cylinder Price: मोठा झटका! गॅसच्या किंमतींबाबत सरकारचा मोठा निर्णय, कोट्यवधी लोकांवर असा होणार परिणाम

Gas Cylinder Price: मोठा झटका! गॅसच्या किंमतींबाबत सरकारचा मोठा निर्णय, कोट्यवधी लोकांवर असा होणार परिणाम

Gas Cylinder Price : देशभरात वाढत्या गॅस सिलिंडरच्या किंमतींदरम्यान सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:55 PM2022-11-14T13:55:00+5:302022-11-14T13:56:36+5:30

Gas Cylinder Price : देशभरात वाढत्या गॅस सिलिंडरच्या किंमतींदरम्यान सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

lpg gas cylinder price update on commercial gas discount has been withdrawal by iocl bpcl hp | Gas Cylinder Price: मोठा झटका! गॅसच्या किंमतींबाबत सरकारचा मोठा निर्णय, कोट्यवधी लोकांवर असा होणार परिणाम

Gas Cylinder Price: मोठा झटका! गॅसच्या किंमतींबाबत सरकारचा मोठा निर्णय, कोट्यवधी लोकांवर असा होणार परिणाम

Gas Cylinder Price :  देशभरात वाढत्या गॅस सिलिंडरच्या किंमतींदरम्यान सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. एलपीजी सिलिंडरवर मिळणारी सूट आता बंद करण्यात आली आहे. याचाच अर्थ आता तुम्हाला एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.

इंधन कंपन्यांकडून कमर्शिअल सिलिंडरवर २०० ते ३०० रुपयांची सूट देण्यात येत होती. परंतु आता ती आता बंद करण्यात आली आहे. डिस्ट्रिब्युटर्सकडून कमर्शिअल सिलिंडरवर अधिक डिस्काऊंट दिलं जात असल्याच्या तक्रारींना लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी कंपन्यांचे आदेश
यापुढे कोणत्याही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना सवलतीची सुविधा मिळणार नाही, असं देशातील तीन सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि एचपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) यांनी माहिती देताना त्यांच्या वितरकांना सांगितलं आहे. हा निर्णय ८ नोव्हेंबरपासून लागू झाला आहे.

यावर सूट नाही
इंडियन ऑईलनं दिलेल्या माहितीनुसार १९ किलोच्या आणि ४७.५ किलोच्या सिलिंडरवर सूट देण्यात येणार नाही. तर एचपीसीएलनं दिलेल्या माहितीनुसार १९ किलो, ४७.५ किलो आणि ४२५ किलोच्या सिलिंडरवर देण्यात येणारी सूटही बंद करण्यात आली आहे.

Web Title: lpg gas cylinder price update on commercial gas discount has been withdrawal by iocl bpcl hp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.