Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या दरात मोठा घसरण, १२३ रुपयांनी स्वस्त झाला सिलिंडर; झटपट जाणून घ्या दर...

LPG Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या दरात मोठा घसरण, १२३ रुपयांनी स्वस्त झाला सिलिंडर; झटपट जाणून घ्या दर...

भारतीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी जून महिन्यासाठी गॅस सिलिंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Today) जाहीर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 11:26 AM2021-06-01T11:26:48+5:302021-06-01T11:27:43+5:30

भारतीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी जून महिन्यासाठी गॅस सिलिंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Today) जाहीर केले आहेत.

lpg gas cylinder prices in 1 june 2021 delhi noida mumbai kolkata | LPG Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या दरात मोठा घसरण, १२३ रुपयांनी स्वस्त झाला सिलिंडर; झटपट जाणून घ्या दर...

LPG Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या दरात मोठा घसरण, १२३ रुपयांनी स्वस्त झाला सिलिंडर; झटपट जाणून घ्या दर...

भारतीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी जून महिन्यासाठी गॅस सिलिंडरचे दर (LPG Gas Cylinder Price Today) जाहीर केले आहेत. देशात १४.२ किलोग्रॅमच्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १२३ रुपयांची घट झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला  तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे दर जाहीर करत असतात. 

तेल कंपन्यांनी जून महिन्यात १४.२ किलोग्रॅम विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच याआधीच्याच किमतीनुसार ८०९ रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. हा दर दिल्लीतील आहे. दिल्लीत १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट होऊन १४७३.५ रुपये झाली आहे. एप्रिल महिन्यात १४.२ किलोग्रॅम घरगुती सिलिंडरच्या किमतीत १० रुपयांनी घट केली होती. तर मे महिन्यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. 

विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या किमती 
तेल कंपन्यांनी १४.२ किलोग्रॅम घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यानुसार दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपये, कोलकातामध्ये ८३५ रुपये, मुंबईत ८०९ रुपये आणि चेन्नईत ८२५ रुपये इतकी आहे. 
 

Read in English

Web Title: lpg gas cylinder prices in 1 june 2021 delhi noida mumbai kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.