Join us  

LPG Latest Price : रक्षाबंधनाच्या दिवशी LPG सिलिंडर अवघ्या 750 रुपयांना मिळणार; जाणून घ्या, कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 6:57 PM

LPG Latest Price : आम्ही कंपोझिट सिलिंडरच्या किंमतीबद्दल बोलत आहोत. या सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस असते आणि त्यामध्ये गॅस दिसत असते.

नवी दिल्ली : रक्षाबंधन तुमच्यासाठी आनंदाची भेट घेऊन येत आहे. खरंतर, तुम्हाला रक्षाबंधनाला घरगुती एलपीजी सिलिंडर फक्त 750 रुपयांमध्ये मिळेल. दरम्यान, आम्ही कंपोझिट सिलिंडरच्या किंमतीबद्दल बोलत आहोत. या सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस असते आणि त्यामध्ये गॅस दिसत असते.

विशेष म्हणजे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 6 जुलै रोजी बदलण्यात आल्या होत्या आणि 1 ऑगस्ट रोजी केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या किमती स्वस्त झाल्या होत्या. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

प्रमुख शहरांमध्ये 10 किलोग्राम कंपोझिट सिलिंडरच्या किंमती... >> दिल्ली- 750 रुपये>> मुंबई- 750 रुपये>> कोलकाता- 765 रुपये>> चेन्नई- 761 रुपये>> लखनौ- 777 रुपये>> जयपूर- 753 रुपये>> पाटणा- 817 रुपये>> इंदूर- 770 रुपये>> अहमदाबाद- 755 रुपये>> पुणे- 752 रुपये>> गोरखपूर - 794 रुपये>> भोपाळ- 755 रुपये>> आग्रा- 761 रुपये>> रांची- 798 रुपये

प्रमुख शहरांमध्ये 14.2 किलो कंपोझिट सिलिंडरच्या किंमती (राउंड फिगरमध्ये)लेह - 1299 रुपयेआयझॉल -  1205श्रीनगर-  1169पाटणा - 1142.5कन्या कुमारी-  1137अंदमान - 1129रांची-  1110.5शिमला-  1097.5दिब्रुगड-  1095लखनौ -  1090.5उदयपूर-  1084.5इंदूर-  1081कोलकाता - 1079डेहराडून - 1072चेन्नई- 1068.5आग्रा- 1065.5चंदीगड- 1062.5 विशाखापट्टणम - 1061अहमदाबाद- 1060भोपाळ - 1058.5जयपूर - 1056.5बंगळुरू - 1055.5दिल्ली - 1053मुंबई - 1052.5

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसाय