Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Price Hike : आजपासून गॅसच्या दरात मोठा बदल, दिल्ली ते मुंबई बदलले रेट; जाणून घ्या स्वस्त की महाग

LPG Price Hike : आजपासून गॅसच्या दरात मोठा बदल, दिल्ली ते मुंबई बदलले रेट; जाणून घ्या स्वस्त की महाग

LPG Price Hike : १ तारखेपासून केंद्र सरकार नियमांमध्ये बदल करत असते. यामुळे आपल्या खिशावरही परिणाम होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 08:11 AM2024-08-01T08:11:28+5:302024-08-01T08:13:41+5:30

LPG Price Hike : १ तारखेपासून केंद्र सरकार नियमांमध्ये बदल करत असते. यामुळे आपल्या खिशावरही परिणाम होऊ शकतो.

LPG Price Big change in gas price from today, rate changed from Delhi to Mumbai; Know whether it is cheap or expensive | LPG Price Hike : आजपासून गॅसच्या दरात मोठा बदल, दिल्ली ते मुंबई बदलले रेट; जाणून घ्या स्वस्त की महाग

LPG Price Hike : आजपासून गॅसच्या दरात मोठा बदल, दिल्ली ते मुंबई बदलले रेट; जाणून घ्या स्वस्त की महाग

१ तारखेपासून सरकार नियमांमध्ये काही बदल करत असते, यामुळे याचा परिणाम आपल्या खिशावर होत असतो. आजपासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात होत आहे. सरकारने या महिन्यातही काही बदल केले आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल केले आहेत, यामुळे एलपीजीच्या सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत.  अर्थसंकल्पानंतर तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती बदलल्या आहेत, तर १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती या वेळीही कायम आहेत. गुरुवार १ ऑगस्टपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ८.५० रुपयांनी महागला आहे.

IOCL वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती १ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू करण्यात आल्या आहेत. 

मुंबईमध्ये बदल काय?

मुंबईत या सिलेंडरची किंमत आजपासून ७ रुपयांनी वाढून १६०५ रुपये झाली आहे, याची आतापर्यंत १५९८ रुपये किंमत होती. चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमतही वाढली आहे, आजपासून येथे १८०९.५० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आता १८१७ रुपयांना मिळत आहे.

दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १६४६ रुपयांवरून १६५२.५० रुपये झाली आहे. एका सिलिंडरचे ६.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कोलकात्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ८.५० रुपयांनी वाढली आहे. कोलकातामध्ये, १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १७५६ रुपयांना मिळत होता आता १७६४.५ रुपयांना मिळत आहे. 

याआधी १ जुलैलाही तेल विपणन कंपन्यांनी एलपीजीच्या दरात कपात केली होती. कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या, दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत ३० रुपयांनी कमी झाली. त्यानंतर ताज्या बदलानंतर, दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६७६ रुपयांवरून १६४६ रुपयांवर आली, कोलकात्यात ती १७८७ रुपयांऐवजी १७५६ रुपयांवर आली, चेन्नईमध्ये १८४०.५० रुपयांऐवजी १८०९.५० रुपये आणि मुंबईत १८०९.५० रुपयांवर आली, याचे दर १६२९ रुपयांवरून १५९८ रुपयांवर आले.

घरगुती सिलेंरच्या किंमतीत बदल नाही

एकीकडे १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत, तर दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दीर्घकाळापासून कायम ठेवली आहेत. केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त मोठा दिलासा देताना १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरवर ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. यानंतर घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत १०० रुपयांनी कमी करण्यात आली. तेव्हापासून सध्या या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि एका सिलिंडरची किंमत दिल्लीत ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना मिळत आहे.

Read in English

Web Title: LPG Price Big change in gas price from today, rate changed from Delhi to Mumbai; Know whether it is cheap or expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.