Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या वर्षात महागाईतून मिळणार दिलासा! घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत होणार कमी

नव्या वर्षात महागाईतून मिळणार दिलासा! घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत होणार कमी

गेल्या काही दिवसापासून देशात महागाईमुळे सर्वासामान्या जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. आता काही दिवसातच नव्या वर्षाला सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 07:00 PM2022-12-22T19:00:10+5:302022-12-22T19:00:19+5:30

गेल्या काही दिवसापासून देशात महागाईमुळे सर्वासामान्या जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. आता काही दिवसातच नव्या वर्षाला सुरुवात होत आहे.

lpg price cut likely in new year 2023 by oil marketing companies after crude oil | नव्या वर्षात महागाईतून मिळणार दिलासा! घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत होणार कमी

नव्या वर्षात महागाईतून मिळणार दिलासा! घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत होणार कमी

गेल्या काही दिवसापासून देशात महागाईमुळे सर्वासामान्या जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. आता काही दिवसातच नव्या वर्षाला सुरुवात होत आहे. नवीन वर्षात तुमच्यासाठी चांगली बातमी मिळू शकते. नव्या वर्षात सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅसच्या किमती कमी करण्याची घोषणा करु शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे.

सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना दिलासा देऊ शकतात. दिल्लीत सध्या 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडरसाठी 1053 रुपये मोजावे लागतात. कोलकात्यात 1079, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068 रुपये. पटनामध्ये 1151 रुपये, तर लखनऊमध्ये 1090 रुपये द्यावे लागतील. सरकारी तेल कंपन्यांनी 6 जुलै 2022 पासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांनी खाली आल्या आहेत.

2022 मध्ये सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमती प्रति सिलेंडर सुमारे 150 रुपयांनी वाढवल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2021 कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरच्या आसपास होती, तेव्हा घरगुती स्वयंपाकाचा गॅस 899 रुपयांना उपलब्ध होता. सध्या, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 83 डॉलरच्या आसपास आहे, तर भारतीय बॅरेलची किंमत प्रति बॅरल 77 डॉलरच्या आसपास आहे. यामुळेच सरकारी तेल कंपन्यांकडे एलपीजी गॅसच्या दरात कपात करणार असल्याचे बोलले जात आहे.

टाटा ग्रूप अमेरिकेतील ही मोठी कंपनी खरेदी करणार, 486.3 कोटी रुपयांना झाली डील

एलपीजी गॅसच्या दरवाढीवरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत. भारत जोडो यात्रेवर असलेले राहुल गांधी यांनी एलपीजी गॅस प्रश्नी  प्रश्न उपस्थित करत आहेत, 2014 मध्ये एलपीजी गॅस 414 रुपये प्रति सिलेंडर कसा होता याची आठवण करुन दिली आहे.

Web Title: lpg price cut likely in new year 2023 by oil marketing companies after crude oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.