LPG Gas Price Today: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात तेल वितरक कंपन्यांनी वाढ केली आहे. एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले असून, १९ किलोचा सिलिंडर १८ रुपयांनी महागला आहे. महिनाभरातच ही वाढ करण्यात आली आहे.
व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचे दर यापूर्वी नोव्हेंबरमध्ये वाढले होते. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत पुन्हा दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.
राजधानी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत १८०२ रुपये होती. ती आता १८१८.५० रुपये इतकी झाली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १९११.५० रुपये इतकी होती. ती आता १९२७ रुपये इतकी झाली आहे.
मुंबईतही १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून, ३० नोव्हेंबरपर्यंत १७५४.५० रुपयांना मिळणारा सिलिंडर आता १७७१ रुपयांना घ्यावा लागणार आहे. याशिवाय चेन्नईमध्ये १९६४.५० रुपयांना मिळणाऱ्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता आता १९८०.५० रुपयांवर गेली आहे.
१ नोव्हेंबर २०२४ रोजी तेल वितरक कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. नोव्हेंबरमध्ये झालेल्या दरवाढी आधी मुंबईत १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १६९२.५० रुपयांना होता. दिल्लीत त्याची किंमत १७४० रुपये इतकी होती. कोलकातामध्ये १८५०.५० रुपये, तर चेन्नईत १९०३ रुपये इतकी होती.