Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Price Hike: पेट्रोल, डिझेल करवाढीनंतर आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

LPG Price Hike: पेट्रोल, डिझेल करवाढीनंतर आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

LPG Price Hike breaking news: थोड्या वेळापूर्वीच सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:11 IST2025-04-07T16:51:14+5:302025-04-07T17:11:22+5:30

LPG Price Hike breaking news: थोड्या वेळापूर्वीच सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 

LPG Price Hike: Another setback after petrol, diesel price hike; LPG gas cylinder becomes more expensive by Rs 50 | LPG Price Hike: पेट्रोल, डिझेल करवाढीनंतर आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

LPG Price Hike: पेट्रोल, डिझेल करवाढीनंतर आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांची वाढ केल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने आणखी एक झटका दिला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. 

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. थोड्या वेळापूर्वीच सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 

महत्वाची बाब म्हणजे ही दरवाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थी आणि गैर-लाभार्थी दोघांनाही लागू आहे. सुधारित किमती ८ एप्रिलपासून लागू होणार आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपयांवरून ५५० रुपयांपर्यंत वाढेल. इतर ग्राहकांसाठी, ती ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहिती, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. 

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढीचा उद्देश ग्राहकांवर भार टाकण्याचा नाहीय. त्याऐवजी अनुदानित गॅसच्या किमती वाढविल्यामुळे तेल विपणन कंपन्यांना झालेल्या ४३,००० कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यास मदत करणे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना देखील सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० रुपये गोळा केले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कपात अपेक्षित होती. परंतू सरकारने दर कमी करण्याऐवजी कर वाढविला आहे. 

Web Title: LPG Price Hike: Another setback after petrol, diesel price hike; LPG gas cylinder becomes more expensive by Rs 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.