Lokmat Money > बिझनेस न्यूज > सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, LPG सिलेंडर महागला, असा आहे नवा दर

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, LPG सिलेंडर महागला, असा आहे नवा दर

LPG Price Hike: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलेंडर महागला आहे. आज १ सप्टेंबरपासून ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे ३९ रुपयांनी वाढ केली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 06:22 AM2024-09-01T06:22:35+5:302024-09-01T07:08:19+5:30

LPG Price Hike: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलेंडर महागला आहे. आज १ सप्टेंबरपासून ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे ३९ रुपयांनी वाढ केली आहे.  

LPG Price Hike: Inflation flares up on first day of September, LPG cylinder becomes expensive | सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, LPG सिलेंडर महागला, असा आहे नवा दर

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, LPG सिलेंडर महागला, असा आहे नवा दर

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलेंडर महागला आहे. आज १ सप्टेंबरपासून ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे ३९ रुपयांनी वाढ केली आहे. मात्र ही वाढ १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या १४ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.  

गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतींबाबत समोर आलेल्या माहितीनुसार १ सप्टेंबरपासून व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरमध्ये ३९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर मुंबईमध्ये १० किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही १६०५ रुपयांवरून वाढून १६४४ रुपये एवढी झाली आहे. 

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार एलपीजीच्या किमतीमध्ये करण्यात आलेली वाढ ही आजपासून लागू झाली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्ययावसायिक सिलेंडरची किंमत ही १६९१.५० रुपये एवढी झाली आहे. तर मुंबईमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसासिक सिलेंडरची किंमत ही १६०५ रुपयांवरून वाढून १६४४ रुपये एवढी झाली आहे. कोलकात्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर १७६४.५० रुपयांवरून वाढून १८०२  रुपये झाला आहे. तर चेन्नईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडर हा १८१७ रुपयांऐवजी १८५५ रुपयांना मिळणार आहे. 

दरम्यान, याआधी ऑगस्ट महिन्यामध्येही एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. तेव्हा १९ किललो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ८.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.  

Web Title: LPG Price Hike: Inflation flares up on first day of September, LPG cylinder becomes expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.