Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Price Hike : एलपीजी ग्राहकांसाठी मोठा झटका; एप्रिलपासून घरगुती गॅसच्या किंमती होणार दुप्पट!

LPG Price Hike : एलपीजी ग्राहकांसाठी मोठा झटका; एप्रिलपासून घरगुती गॅसच्या किंमती होणार दुप्पट!

LPG Price Hike : जगभरात गॅसची मोठी टंचाई (Global Gas Crunch) निर्माण झाली असून एप्रिलपासून त्याचा परिणाम भारतातही दिसू शकतो, त्यामुळे याठिकाणीही गॅसच्या किमती (Domestic Gas Prices) दुपटीने वाढू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:28 PM2022-02-22T15:28:51+5:302022-02-22T15:31:21+5:30

LPG Price Hike : जगभरात गॅसची मोठी टंचाई (Global Gas Crunch) निर्माण झाली असून एप्रिलपासून त्याचा परिणाम भारतातही दिसू शकतो, त्यामुळे याठिकाणीही गॅसच्या किमती (Domestic Gas Prices) दुपटीने वाढू शकतात.

lpg price hike news lpg may become costlier from april 2022 the price of lpg will be doubled lpg latest news | LPG Price Hike : एलपीजी ग्राहकांसाठी मोठा झटका; एप्रिलपासून घरगुती गॅसच्या किंमती होणार दुप्पट!

LPG Price Hike : एलपीजी ग्राहकांसाठी मोठा झटका; एप्रिलपासून घरगुती गॅसच्या किंमती होणार दुप्पट!

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ आता एलपीजीमुळेही ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एप्रिल 2022 पासून स्वयंपाक बनवणे आणखी महाग होऊ शकते. जगभरात गॅसची मोठी टंचाई (Global Gas Crunch) निर्माण झाली असून एप्रिलपासून त्याचा परिणाम भारतातही दिसू शकतो, त्यामुळे याठिकाणीही गॅसच्या किमती (Domestic Gas Prices) दुपटीने वाढू शकतात.

जागतिक स्तरावर गॅस टंचाई
जागतिक स्तरावर गॅस टंचाईमुळे सीएनजी (CNG), पीएनजी (PNG) आणि विजेच्या किमती वाढणार आहेत. त्यासोबतच वाहने चालवण्याबरोबरच कारखान्यांतील उत्पादन खर्चही वाढू शकतो. सरकारच्या खत अनुदान विधेयकातही (Fertilizer Subsidy Bill) वाढ होऊ शकते. एकूणच या सगळ्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच बसणार आहे.

पुरवठा कमी होऊ शकतो
रशिया हा युरोपला गॅस पुरवठ्याचा प्रमुख स्त्रोत आहे, म्हणजेच युक्रेनच्या संकटामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्था कोरोनाच्या प्रादुर्भावातून नक्कीच बाहेर येत आहे. परंतु जगभरातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीमुळे तिचा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळेच गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

एप्रिलपासून परिणाम दिसून येईल
रशिया -युक्रेनमधील तणावामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे, त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. तसेच, आता गॅस देखील प्रभावित होऊ शकतो. ज्यावेळी सरकार नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत किमतीत बदल करेल, त्यावेळी जागतिक गॅस टंचाईचा परिणाम एप्रिल 2022 पासून दिसून येईल.  तज्ज्ञांच्या मते, 2.9 डॉलर प्रति एमएमबीटीयूवरून 6 ते 7 डॉलरपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते.

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मते, खोल समुद्रातून निघणाऱ्या वायूची किंमत 6.13 डॉलरवरून जवळपास 10 डॉलरपर्यंत वाढेल. कंपनी पुढील महिन्यात काही गॅसचा लिलाव करणार आहे. यासाठी, कंपनीने फ्लोअर प्राईस कच्च्या तेलासोबत जोडली आहे, जी सध्या 14 डॉलर प्रति एमएमबीटीयू आहे.

Web Title: lpg price hike news lpg may become costlier from april 2022 the price of lpg will be doubled lpg latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.