Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Price Hike: महागाईचा आगडोंब! पेट्रोल, डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मोठी दरवाढ

LPG Price Hike: महागाईचा आगडोंब! पेट्रोल, डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मोठी दरवाढ

Petrol, Diesel, LPG Price increase: आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:10 AM2022-03-22T08:10:34+5:302022-03-22T08:11:36+5:30

Petrol, Diesel, LPG Price increase: आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत.

LPG Price Hike: Petrol-Diesel Prices Hike by 80 paisa per liter; LPG domestic gas cylinders price hike by Rs 50 per cylinder | LPG Price Hike: महागाईचा आगडोंब! पेट्रोल, डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मोठी दरवाढ

LPG Price Hike: महागाईचा आगडोंब! पेट्रोल, डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मोठी दरवाढ

तब्बल १३७ दिवसांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविल्यानंतर आज सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब कोसळला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत. तसेच आधीचा विक्रम देखील मोडण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांना आग लागलेली असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. 



 

इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच लागू होणार आहेत. ही दरवाढ १४.२ किलोच्या सिलिंडवर करण्य़ात आली आहे. यामुळे आजपासून या सिलिंडरच्या किंमती 949.50 प्रति सिलिंडर असणार आहेत. 



 

दिल्लीत ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिझेल 115 रुपये प्रति लीटर -
पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत भलेही 137 दिवसांपासून वाढ झालेली नसेल, पण ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात अचानकपणे थेट 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता दिल्लीत ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिझेल 115 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. या निर्णयापासूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार, असा कयास लावला जात होता.



 

Web Title: LPG Price Hike: Petrol-Diesel Prices Hike by 80 paisa per liter; LPG domestic gas cylinders price hike by Rs 50 per cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.