LPG Gas Price Today: सामान्यांवर महागाईचं संकट सध्या मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. १ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून अनेक गोष्टींसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. अशा परिस्थितीत आता सरकारी इंधन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर (LPG Gas Cylinder Price) मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. आज कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या सिलिंडरच्या दरात २६६ रुपयांची वाढ करण्यात आली. दरम्यान घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आजच्या वाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरचे दर आता २१०० रुपयांच्या वर गेले आहेत. याशिवाय दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर ८९९.५० रुपये इतके झाले आहे.
कोणत्या शहरात किती दर?दिल्ली- २१०१ रुपयेकोलकाता - २१७७ रुपयेमुंबई - २०५१ रुपयेचेन्नई - २२३४ रुपये
कसे पाहाल दर?जर तुम्हाला आपल्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर तपासायचे असतील तर तुम्ही इंधन कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून पाहू शकता. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करूनही तुम्हाला नवे दर पाहतो येतील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे नवे दर जारी करण्यात येतात.