Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Price today: नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्या पण, स्वस्त झाला गॅस सिलिंडर; पाहा किंमत

LPG Price today: नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्या पण, स्वस्त झाला गॅस सिलिंडर; पाहा किंमत

पाहा काय आहेत नवे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 07:13 AM2022-10-01T07:13:20+5:302022-10-01T07:14:13+5:30

पाहा काय आहेत नवे दर...

LPG Price today Natural gas prices increased but gas cylinders became cheaper check commercial gas cylinder price | LPG Price today: नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्या पण, स्वस्त झाला गॅस सिलिंडर; पाहा किंमत

LPG Price today: नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्या पण, स्वस्त झाला गॅस सिलिंडर; पाहा किंमत

LPG Price Today 1 Oct 2022: नवरात्रीच्या कालावधीत एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत (LPG Latest Price) ही कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. IOCL नुसार, 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 25.5 रुपये, कोलकाता 36.5 रुपये, मुंबई 32.5 रुपये, चेन्नईमध्ये 35.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

दिल्लीत इंडेनचा 19 किलोचा सिलिंडर 1885 रुपयांऐवजी आता 1859.5 रुपयांना मिळणार आहे. तर कोलकात्यात 1995.50 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होईल. यापूर्वी हा सिलिंडर 1959 रुपयांना मिळत होता. त्याचबरोबर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1844 रुपयांऐवजी 1811.5 रुपयांना मिळेल. तर चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 2009.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी चेन्नईत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 2045 रुपये होती.

नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्या
शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी 40 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे येत्या काळात वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस देशात महाग होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे  शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती 27 रुपयांनी वाढून 6,727 रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर कच्च्या तेलाच्या ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरीसाठी कराराच्या किमतीत वाढ झाली आहे. ऑक्टोबरमधील डिलिव्हरीचा करार 27 रुपये किंवा 0.4 टक्क्यांनी वाढून 6,727 रुपये प्रति बॅरल झाला. यामध्ये 6,085 लॉटचा व्यवसाय झाला होता. व्यावसायिकांद्वारे आपल्या व्यवहाराचा आकार वाढवल्यामुळे कच्च्या तेलाच्या वायदा किमतीत वाढ झाल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

Web Title: LPG Price today Natural gas prices increased but gas cylinders became cheaper check commercial gas cylinder price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.