Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG subsidy: स्वयंपाकाच्या गॅसवरील सब्सिडीसंदर्भात सरकारचं मोठं वक्तव्य; या लोकांना मिळणार दिलासा

LPG subsidy: स्वयंपाकाच्या गॅसवरील सब्सिडीसंदर्भात सरकारचं मोठं वक्तव्य; या लोकांना मिळणार दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्य 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या घोषणेबरोबरच, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 12:37 AM2022-06-03T00:37:48+5:302022-06-03T00:39:19+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्य 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या घोषणेबरोबरच, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली होती.

LPG subsidy: Government's big statement about lpg gas subsidy These people will get relief | LPG subsidy: स्वयंपाकाच्या गॅसवरील सब्सिडीसंदर्भात सरकारचं मोठं वक्तव्य; या लोकांना मिळणार दिलासा

LPG subsidy: स्वयंपाकाच्या गॅसवरील सब्सिडीसंदर्भात सरकारचं मोठं वक्तव्य; या लोकांना मिळणार दिलासा

सरकार उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन मिळालेल्या केवळ नऊ कोटी लाभार्थ्यांनाच एलपीजी सबसिडी देत ​​आहे आणि इतर लाभार्थ्यांना बाजारभावानेच एलपीजी सिलिंडर घ्यावे लागेल. यासंदर्भात बोलताना, पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी गुरुवारी सांगितले की, जून 2020 नंतरपासून  एलपीजीवर कसल्याही प्रकारचे अनुदान दिले जात नाही. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अर्थमंत्र्यांनी केली होती घोषणा - 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्य 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या घोषणेबरोबरच, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली होती. सध्या 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1,003 रुपये एवढी आहे. सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक सिलिंडरचे बुकिंगनंतर, 200 रुपये सबसिडी पाठवेल.

स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीसंर्भात कोणतीही अधिकृत घोषणा नाही -
खरे तर, स्वयंपाकाच्या गॅसवरील सब्सिडी थांबविण्यासंदर्भात सरकारकडून कसल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षभरात एलपीजी सिलिंडर 103.50 रुपयांनी महागला आहे. जून 2021 मध्ये सिलिंडरची किंमत 809 रुपये एवढी होती. याच बरोबर, आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असतानाही, गॅस ग्राहकांवर त्याचा संपूर्ण भार टाकला जात नाही, असे पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.
 

Web Title: LPG subsidy: Government's big statement about lpg gas subsidy These people will get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.