Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Subsidy : एलपीजी सिलिंडरवर सबसिडी हवी असेल तर आजच करा 'हे' काम

LPG Subsidy : एलपीजी सिलिंडरवर सबसिडी हवी असेल तर आजच करा 'हे' काम

LPG Subsidy : तुम्हीही एलपीजी सिलिंडर खरेदी करत असाल आणि सबसिडी तुमच्या बँक खात्यात येत नसेल, तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 01:24 PM2021-11-25T13:24:01+5:302021-12-19T18:21:56+5:30

LPG Subsidy : तुम्हीही एलपीजी सिलिंडर खरेदी करत असाल आणि सबसिडी तुमच्या बँक खात्यात येत नसेल, तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. 

LPG Subsidy: If you want a subsidy on LPG cylinders, then do it today | LPG Subsidy : एलपीजी सिलिंडरवर सबसिडी हवी असेल तर आजच करा 'हे' काम

LPG Subsidy : एलपीजी सिलिंडरवर सबसिडी हवी असेल तर आजच करा 'हे' काम

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 79.26 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी म्हणून ग्राहकांच्या खात्यात येऊ लागले आहेत. तुम्हीही एलपीजी सिलिंडर खरेदी करत असाल आणि सबसिडी तुमच्या बँक खात्यात येत नसेल, तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. 

जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर त्याचे मुख्य कारण म्हणजे एलपीजी आयडीचे अकाऊंट नंबरला लिंक केलेले नाही. यासाठी तुमच्या जवळच्या वितरकाशी संपर्क साधा आणि त्याला तुमची समस्या सांगा. तुम्ही 18002333555 या टोल फ्री नंबरवर कॉल करूनही तुमची तक्रार नोंदवू शकता.

कोणाला दिली जात नाही सबसिडी?
एलपीजीची सबसिडी राज्यांमध्ये वेगळी आहे, ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सबसिडी दिली जात नाही. 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांची कमाई मिळून आहे.

किती मिळतेय सबसिडी?
सध्याच्या काळात घरगुती गॅसवरील सबसिडी खूपच कमी राहिली आहे. ग्राहकांना आता बँक अकाऊंटमध्ये सबसिडी म्हणून 79.26 रुपये मिळत आहेत. एकेकाळी 200 रुपयांपर्यंत सबसिडी मिळत होती, ती आता 79.26 रुपयांवर आली आहे. मात्र, काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 (LPG Subsidy) सबसिडी मिळत आहे.

असे जाणून घ्या तुमचे स्टेटस
>> http://mylpg.in/ वर जा आणि तुमचा LPG आयडी लिहा.
>> तुम्ही वापरत असलेल्या OMC LPG च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल.
>> तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर लिहा.
>> आता कॅप्चा कोड टाका आणि नेस्ट पेजवर क्लिक करा
>> तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
>> आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून पासवर्ड तयार करावा लागेल.
>> एकदा पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक लिंक मिळेल. तुमच्या मेलवर गेल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
>> आता mylpg.in खात्यावर लॉगिन करा आणि पॉप अप मेसेजमध्ये तुमचे डिटेल्स टाइप करा.
>> आता View Cylinder Booking History/Subsidy Transfer या ऑप्शनवर क्लिक करा.

Web Title: LPG Subsidy: If you want a subsidy on LPG cylinders, then do it today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.