Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Subsidy: एलपीजी सबसिडीबाबत सरकारचा नवीन प्लॅन? जाणून घ्या, आता कोणाला मिळणार पैसे

LPG Subsidy: एलपीजी सबसिडीबाबत सरकारचा नवीन प्लॅन? जाणून घ्या, आता कोणाला मिळणार पैसे

LPG Subsidy: आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 10 लाख रुपये उत्पन्नाचा नियम लागू राहणार असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडीचा लाभ मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 06:21 PM2021-12-19T18:21:20+5:302021-12-19T18:24:56+5:30

LPG Subsidy: आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 10 लाख रुपये उत्पन्नाचा नियम लागू राहणार असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडीचा लाभ मिळणार आहे.

lpg subsidy update govt said internal assessment no decision on lpg subsidy know here details | LPG Subsidy: एलपीजी सबसिडीबाबत सरकारचा नवीन प्लॅन? जाणून घ्या, आता कोणाला मिळणार पैसे

LPG Subsidy: एलपीजी सबसिडीबाबत सरकारचा नवीन प्लॅन? जाणून घ्या, आता कोणाला मिळणार पैसे

नवी दिल्ली : एलपीजी (LPG) सिलिंडरच्या सबसिडीबाबत ग्राहकांना मोठी बातमी मिळू शकते. एलपीजी सिलिंडरची किंमत 1000 रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याची चर्चा सतत होत आहे. एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या महागाईबाबत सरकारचे मत अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनात (Internal Assessment) असे दिसून आले आहे की,  ग्राहक एका सिलिंडरसाठी 1000 रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरबाबत सरकार दोन भूमिका घेऊ शकते. एकतर सरकार सबसिडीशिवाय सिलिंडर पुरवठा करू शकते आणि दुसरे म्हणजे काही निवडक ग्राहकांनाही सबसिडीचा लाभ दिला जाऊ शकतो. परंतू सबसिडी देण्याबाबत सरकारकडून अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 10 लाख रुपये उत्पन्नाचा नियम लागू राहणार असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, उर्वरित लोकांसाठी सबसिडी संपुष्टात येऊ शकते.

सध्या सबसिडीची काय स्थिती?
एलपीजीवरील सबसिडी काही ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे आणि हा नियम मे 2020 पासून सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोना महामारीच्या काळात कच्चे तेल आणि गॅसच्या किमती सातत्याने घसरल्यानंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत सरकारने एलपीजी सिलिंडरवरील (LPG cylinder) सबसिडी पूर्णपणे बंद केलेले नाही.

सबसिडीवर सरकार किती खर्च करतंय?
2021 या आर्थिक वर्षात सबसिडीवरील सरकारचा खर्च 3,559 रुपये होता. आर्थिक वर्ष 2020 मध्ये हा खर्च 24,468 कोटी रुपये होता. दरम्या, ही DBT योजनेअंतर्गत आहे, जी जानेवारी 2015 मध्ये सुरू झाली होती, ज्या अंतर्गत ग्राहकांना विनासबसिडी एलपीजी सिलिंडरची संपूर्ण रक्कम भरावी लागते. त्याचबरोबर,  सबसिडीचे पैसे सरकारकडून ग्राहकांच्या बँक खात्यात परत केले जातात. हा परतावा थेट असल्याने योजनेला DBTL असे नाव देण्यात आले आहे.

सतत वाढतायेत किंमती
1 सप्टेंबर रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती. ही वाढ 14.2 किलोच्या सिलिंडरवर म्हणजेच घरगुती गॅसवर करण्यात आली आहे. या वाढीमुळे दिल्लीत सिलिंडरची किंमत 884.50 रुपयांवर पोहोचली आहे. 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत सध्या मुंबईत 884.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 900.50 रुपये आहे. म्हणजेच गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
 

Web Title: lpg subsidy update govt said internal assessment no decision on lpg subsidy know here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.