Join us  

L&T Finance Holdings च्या निव्वळ नफ्यात १०३ टक्क्यांची वाढ, ₹५३१ कोटींचा विक्रमी नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 4:57 PM

कंपनीनं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

एल अँड टी फायनान्स होल्डिंग्सनं (L&T Finance Holdings) बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून 2023) निकाल जाहीर केले. जून तिमाहीत तिचा निव्वळ नफा जवळपास 103 टक्क्यांनी वाढून 531 कोटी रुपये झाल्याची माहिती कंपनीनं दिली. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 262 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. 

तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचा किरकोळ निव्वळ नफा मार्च तिमाहीत वार्षिक 176 टक्क्यांनी वाढून 533 कोटी रुपये झाला आहे. नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये स्थिर वाढ, फी आणि क्रेडिट कॉस्टमध्ये घट यामुळे जून तिमाहीत नफा वाढण्यास मदत झाली असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

एल अँड टी फायनान्स होल्डिंग्जचा रिटेल पोर्टफोलिओ मिक्स जून तिमाहीच्या अखेरीस 82 टक्के होता. जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 54 टक्के होता आणि मार्च तिमाहीत 75 टक्के होता. जून तिमाहीत रिटेल लोन डिस्बर्सल वार्षिक 25 टक्क्यांनी वाढून 11,193 कोटी रुपये झाले. तर कंपनीचं रुरल ग्रुल लोन आणि मायक्रो फायनान्स 18 टक्क्यांनी वाढून 4,511 कोटी रुपये झाले. तर फार्म इक्विपमेंट फायनान्स 15 टक्क्यांनी वाढून 1,757 कोटी रुपये झाल्याचं कंपनीनं सांगितलं.

कंझ्युमर लोनमध्येही वाढयाशिवाय कंझ्युमर लोनमध्येही वाढ दिसून आली. कंपनीनं जून तिमाहीत 1,162 कोटी रुपयांची कंझ्युमर लोन वितरित केली. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा 1,010 कोटी रुपये होता.

टॅग्स :व्यवसाय