Lokmat Money > बिझनेस न्यूज > L&T समूहाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा, 'या' व्यक्तीच्या खांद्यावर जबाबदारी

L&T समूहाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा, 'या' व्यक्तीच्या खांद्यावर जबाबदारी

दिग्गज कंपनी L&T चे अध्यक्ष एएम नाईक यांनी शनिवारी समूहाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 05:52 PM2023-10-01T17:52:22+5:302023-10-01T17:53:12+5:30

दिग्गज कंपनी L&T चे अध्यक्ष एएम नाईक यांनी शनिवारी समूहाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

L&T Group Chairman AM Naik Resigns, Responsibility on SM Subrhamanyam | L&T समूहाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा, 'या' व्यक्तीच्या खांद्यावर जबाबदारी

L&T समूहाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा, 'या' व्यक्तीच्या खांद्यावर जबाबदारी

कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील दिग्गज कंपनी L&T चे अध्यक्ष एएम नाईक यांनी शनिवारी समूहाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी US$23 अब्ज डॉलर्सच्या बिझनेस ग्रुपचे नेतृत्व एसएन सुब्रमण्यन यांच्याकडे सोपवले. नाईक (81) आता एम्प्लॉईज ट्रस्टचे अध्यक्ष राहतील. यापुढे ते विविध सामाजिक उपक्रम राबवण्यावर लक्ष केंद्रित करतील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

यापुढे एएम नाईक त्यांच्या सामाजिक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करतील, ज्यात नाईक चॅरिटेबल ट्रस्टचा समावेश आहे. ही ट्रस्ट वंचितांच्या शिक्षण आणि कौशल्य निर्मितीच्या क्षेत्रात काम करते. याशिवाय निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट अनुदानित किंमतीवर आरोग्य सेवा सुलभ करण्यासाठी कार्य करते. विशेष म्हणजे, नाईक यांनी 1965 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कंपनीत सुरुवात केली आणि ग्रुपच्या चेअरमन पदार्यंत गेले.

CBDT चेअरमनचा कार्यकाळ वाढवला
दरम्यान, केंद्र सरकारने CBDT चेअरमन नितीन गुप्ता यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत, नऊ महिन्यांसाठी वाढवला आहे. त्यांच्या नियोजित निवृत्तीला शनिवारी मुदतवाढ देण्यात आली. गुप्ता (60) हे आयकर विभागाचे 1986 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांची सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार होते.
    
UIDAI CEO च्या सेवेत एक वर्षांची मुदतवाढ
अमित अग्रवाल यांना युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे CEO म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिकृत नोटीसमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अग्रवाल हे 1993 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) छत्तीसगड केडरचे अधिकारी आहेत. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अग्रवाल यांचा UIDAI चे CEO म्हणून कार्यकाळ 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे.

Web Title: L&T Group Chairman AM Naik Resigns, Responsibility on SM Subrhamanyam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.