नागपूर : विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन व टुथपेस्टच्या लकी ड्रॉ कुपनची सोडत ब्रँड अॅम्बेसडर अतुल परचुरे यांच्या हस्ते १५ आॅगस्ट रोजी काढण्यात आली. यावेळी गायक मिलिंद इंगळे तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून आलेले १२०० वितरक, विक्रेते उपस्थित होते. सोडतीत ३ आय टेन ह्युंदाई कार्स होत्या.या कार शिवमंगल प्रोव्हिजन्स नांदुरा जि. बुलडाणा, गुरुकृपा किराणा साकोली जिल्हा भंडारा आणि ओम किराणा लालगंज नागपूर यांना प्रदान करण्यात आल्या. इतर विक्रेत्यांना १५ होंडा अॅक्टीव्हा बक्षिस रूपात देण्यात आल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर लकी ड्रॉचे कुपन काढण्यात आले. एकूण ३५०२ बक्षिसे असल्यामुळे बक्षिस वाटपाचे काम अद्यापही सुरुच असल्याचे कंपनीने कळविले आहे. कार्यक्रमात मिलिंद इंगळे यांनी गायन केले तर अतुल परचुरे यांनी निवेदन केले. योजनेचे स्वप्नपूर्ती हे नाव सार्थकी झाले. बक्षिसे वाटप करण्यासाठी पारदर्शक पद्धत वापरल्यामुळे अशीच पद्धत भविष्यातही वापरण्याची मागणी विक्रेत्यांनी केली. नुकत्याच बाजारात आलेल्या विठोबा टुथपेस्टला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)
विठोबा स्वप्नपूर्ती योजनेचा लकी ड्रॉ
By admin | Published: September 03, 2015 10:00 PM