माथाडी कामगार राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहणार माथाडी नेत्यांचे आश्वासन : राष्ट्रवादीची साथ दिल्याने कामे रखडविल्याची टीका
By admin | Published: September 25, 2014 11:04 PM
नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे होतो व यापुढेही राहणार आहे. यामुळेच आमची कामे जाणीवपूर्वक रखडवली असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली आहे.
नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे होतो व यापुढेही राहणार आहे. यामुळेच आमची कामे जाणीवपूर्वक रखडवली असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली आहे. बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनच्यावतीने आयोजित माथाडी मेळाव्यात सर्वच कामगार नेत्यांनी राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे यांनीही माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आता कामगारांनी आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. ज्या मतदार संघात कामगारांची ताकद आहे तेथे राष्ट्रवादीचा उमेदवारास विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले. आमदार नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या घरांचा व इतर प्रश्न राष्ट्रवादीमुळे सुटले आहेत. कामगारांना अजून दहा हजार घरे देण्याची सूचना शरद पवार यांनी केली होती. परंतु कामगार राष्ट्रवादीला साथ देत असल्यामुळे कामगारांचे प्रश्न रखडविले जात आहेत. घरांमध्येही इतरांना वाटा देण्यात आल्याची टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली. येणार्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रस राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाला पाहिजे. कोणत्याही स्थितीमध्ये अजितदादा पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे मत माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी व्यक्त केले. या मेळाव्यास संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. माथाडी भूषण पुरस्काराचे वितरणमाथाडी मेळाव्यात १४ कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देवून राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये महादेव तुकाराम पडळकर, धोंडीबा गणपत वाडकर, बाळू लक्ष्मण वाडगे, नामदेव रामभाऊ गाडगे, अंकुश निवृत्ती जाधव, संजय लक्ष्मण वाघ, संजय जिजाबा रूपनवर, सचिन मनोहर सपकाळ, अशोक रघुनाथ कदम, सुरेश बाबूराव भोसले, लहू दत्तात्रय पवार, विकास ज्ञानेश्वर जगताप, नारायण काशिनाथ पोटे, बबन नाना तुपलोंढे यांचा समावेश आहे. सूचना शरद पवार यांच्या भाषणाची स्वतंत्र बातमी केली आहे. ही बातमी सरांना विचारून घेणे. बाबूराव रामिष्टे यांच्या अखिल भारतीय माथाडीसंघटनेचीही स्वतंत्र बातमी पाठवत आहे