इलेक्ट्रिक उपकरणे बनविणारी जपानी कंपनी तोशिबा आपल्या ५ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याचे वृत्त आहे. जागतिक पातळीवर नोकर कपातीचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे संकेत मिळत आहेत.
जपानी माध्यम ‘निक्केई एशिया’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. तोशिबा जपानमधील ५ हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीच्या नावाखाली काढणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. याआधी २०१५ मध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती.
या कपातीचा फटका मुख्यालयात बँक-ऑफिसची कामे करणाऱ्यांना बसेल. घरी बसवल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून विशेष निवृत्ती लाभ मिळेल. या लाभासह आऊटप्लेसमेंट सेवेवर कंपनीचा ६४६ दशलक्ष डॉलरचा खर्च होईल.