संजय खांडेकर
अकोला : एरंडेल तेलापासून काढल्या जाणाºया केमिकल्सची निर्मिती प्रक्रिया क्लिष्ट समजली जाते. ही प्रक्रिया अकोला एमआयडीसीत होत असून, वर्षाकाठी १० ते १५ टन साठा येथील अक्षय केमिकल्समधून युरोपीय देशात निर्यात होत आहे.
येथील केमिकल इंजिनीअर शैलेंद्र भुतडा या तरुण उद्योजकाने अडचणींवर मात करून हा उद्योग उभारला. विदर्भात कच्चा माल मिळत नसल्याने, त्यांनी तो गुजरातमधून मागविला. हा उद्योग सातासमुद्रापार पोहोचविला आहे. एरंडेल तेलापासून अनडिसिलिनिक अॅसिड, हेप्टलडीहाइड, मिथाइल अनडिसिलेनेट, मिथाइल रीसिनोलेटसह ५ प्रकारची केमिकल्स तयार केली जातात. त्यांना युरोपीय देशांत मोठी मागणी आहे. दरवर्षी जवळपास १०-१५ टन केमिकल्स युरोपीय राष्ट्रांत निर्यात होते. या केमिकल्सने शुद्धतेचे प्रमाण सिद्ध केल्याने, अकोल्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकले आहे.
असे उद्योग कमीच-
एरंडेलपासून केमिकल्सची निर्मिती करणाºयामध्ये फ्रान्समधील आरकेमा ग्रुप, गुजरात, राजकोेट येथील एसीएमई सिंथेटिक्स ग्रुप आणि अकोल्यातील अक्षय केमिकल्सचा प्रामुख्याने समावेश होतो. परफ्युमरी, रबर, फार्मास्युटिकल आणि शेतातील खतनिर्मितीसाठी या केमिकल्सची आवश्यकता असते.
एरंडेलपासून निर्मित केमिकल्स युरोपात! अकोल्याची यशोगाथा; तरुण उद्योजकाने केली किमया
एरंडेल तेलापासून काढल्या जाणाºया केमिकल्सची निर्मिती प्रक्रिया क्लिष्ट समजली जाते. ही प्रक्रिया अकोला एमआयडीसीत होत असून, वर्षाकाठी १० ते १५ टन साठा येथील अक्षय केमिकल्समधून युरोपीय देशात निर्यात होत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:35 AM2018-01-25T00:35:46+5:302018-01-25T00:36:13+5:30