लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जून २०२४ मध्ये भारतीय कार उत्पादक कंपन्यांनी ७६,२९७ वाहनांची निर्यात केली. यात कार आणि एसयूव्ही वाहनांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारची निर्यात करणाऱ्या कंपन्यांत फॉक्सवॅगन, निसान, मारुती आणि हुंदाई यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये ५७,६१६ वाहनांची निर्यात झाली होती. यंदा हा आकडा वाढून ७६,२९७ झाला. याचाच अर्थ वाहनांच्या विक्रीत ३२ टक्के वाढ झाली आहे.
जून २०२४ मध्ये निर्यात झालेल्या टॉप-३ कार सेडान श्रेणीतील आहेत. निर्यात झालेल्या टॉप-५ गाड्यांत मारुतीच्या दोन गाड्यांचा समावेश आहे.
या गाड्यांना कमी पसंती
जून २०२४ मध्ये निर्यातीच्या बाबतीत काही गाड्यांना फारच कमी पसंती मिळाली. यात मारुती इनव्हिक्टो, सिट्रॉएन ईसी ३ आणि महिंद्रा एक्सयूव्ही ४०० यांचा समावेश आहे.