Lokmat Money > बिझनेस न्यूज > मेड इन इंडिया स्मार्ट फोनचा बाजार हिस्सा २४.८ टक्के

मेड इन इंडिया स्मार्ट फोनचा बाजार हिस्सा २४.८ टक्के

केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ पुढाकाराचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. भारतात तयार झालेल्या ‘स्मार्ट फोन’चा बाजारातील वाटा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या

By admin | Published: August 19, 2015 10:38 PM2015-08-19T22:38:30+5:302015-08-19T22:38:30+5:30

केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ पुढाकाराचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. भारतात तयार झालेल्या ‘स्मार्ट फोन’चा बाजारातील वाटा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या

Made in India smart phone market share 24.8 percent | मेड इन इंडिया स्मार्ट फोनचा बाजार हिस्सा २४.८ टक्के

मेड इन इंडिया स्मार्ट फोनचा बाजार हिस्सा २४.८ टक्के

बंगळुरू : केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ पुढाकाराचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. भारतात तयार झालेल्या ‘स्मार्ट फोन’चा बाजारातील वाटा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये २४.८ टक्के झाला आहे. गेल्या तिमाहीमध्ये विकल्या गेलेल्या स्मार्ट फोनमध्ये भारतात तयार झालेल्या स्मार्ट फोनचा वाटा २४.८ टक्के होता. हाच वाटा त्याआधीच्या तिमाहीत १९.९ टक्के होता.
सायबर मीडिया रिसर्च या संशोधन संस्थेने अहवालात म्हटले आहे की, जून तिमाहीमध्ये देशात ५.६६ कोटी हँडसेट विकले गेले. त्यात ४३ टक्के (२.४८ कोटी हँडसेट) वाटा स्मार्ट फोनचा होता.
देशात स्मार्टफोनची विक्री एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये २४.८ टक्क्यांनी वाढून २.४४ कोटी संख्येत झाली. कोरियाची हँडसेट कंपनी सॅमसंग भारतीय बाजारात क्रमांक एकवर आहे. जूनअखेर संपलेल्या तिमाहीमध्ये देशात स्मार्टफोन विक्रीचा वाटा ४३ टक्के होता. त्याआधीच्या तिमाहीत तो ३६.८ टक्के होता. स्मार्टफोन विक्रीमध्ये आणखी वाढ होणार आहे सप्टेंबरपर्यंत हँडसेटच्या विक्रीत स्मार्टफोनचा वाटा ५० टक्के असेल. एकूण हँडसेटच्या बाजारात सॅमसंगचा वाटा २०.६ टक्के तर स्मार्टफोनच्या विक्रीत २४.६ टक्के आहे. मायक्रोमॅक्सचा एकूण फोन बाजारपेठेतील वाटा १२.३ टक्के व स्मार्टफोनमध्ये १४.८ टक्के आहे. बाजारात मायक्रोमॅक्सचे स्थान दुसरे आहे. एकूण फोन बाजारात इन्टेक्सचा वाटा ९.५ व स्मार्टफोनमध्ये १०.४ टक्के आहे.

Web Title: Made in India smart phone market share 24.8 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.