Join us  

'रिपोर्टमधील आरोप माधबी पुरी बुच यांनी काही अंशी मान्य केले,' Hindenburgचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:25 AM

Hindernburg on Adani & SEBI : पाहा कोणते आहेत हे आरोप, ज्याबद्दल हिंडेनबर्गनं पुन्हा माधबी पुरी बुच यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय.

Hindernburg on Adani & SEBI : हिंडेनबर्गनं सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर माधबी पुरी आणि सेबीनंही त्यावर प्रतिक्रिया देत हे आरोप हे आरोप निराधार आणि चारित्र्यहनन करणारे असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे अदानी समूहानंही हे आरोप फेटाळून लावले होते. परंतु यानंतर हिंडेनबर्गनं पुन्हा एकदा माधबी पुरी बुच यांच्यावर निशाणा साधलाय. 'आमच्या ताज्या अहवालात केलेले आरोप सेबी प्रमुखांनी काही प्रमाणात मान्य केले आहेत,' असा दावा त्यांनी केलाय.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हिंडेनबर्गनं हा दावा करत पुन्हा एकदा निशाणा साधला. सेबी प्रमुखांची गुंतवणूक अदानींशी संबंधित कंपन्यांमध्ये असल्यानं सेबीनं अदानी समूहाच्या रिपोर्टवर कारवाई करण्याचा करण्याची इच्छा व्यक्त केली नाही, असं या अहवालात म्हटलं आहे.

काय म्हटलंय नव्या पोस्टमध्ये?

"सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी १० ऑगस्ट २०२४ रोजी हिंडेनबर्गनं त्यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत एक निवेदन जारी केलंय. यानुसार हिंडेनबर्गच्या अहवालात नमूद केलेला फंडात २०१५ साली गुंतवणूक करण्यात आली होती, जेव्हा दोघेही सिंगापूरमध्ये राहणारे नागरिक होते. माधबी पुरी बुच सेबीमध्ये सामील होण्याआधीची, पूर्णवेळ सदस्याच्या रुपात येण्याच्या २ वर्षांपूर्वीची ही गुंतवणूक होती." 

मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल अहुजा धवल बुच यांचे बालपणीचे शाळेतील आणि आयआयटी दिल्लीचे मित्र असल्याने फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिटी बँक, जेपी मॉर्गन आणि थ्रीआय ग्रुप पीएलसीचे माजी कर्मचारी म्हणून त्यांची अनेक दशकांची मजबूत कारकीर्द आहे, ज्याला अनिल अहुजा यांनी दुजोरा दिला आहे. कोणत्याही वेळी फंडानं अदानी समूहाच्या कोणत्याही कंपनीच्या रोखे, इक्विटी किंवा डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक केली नाही."

काय म्हटलंय बुच यांनी?

हिंडेनबर्ग रिसर्च’नं केलेल्या दाव्यांत ‘सेबी’च्या अध्यक्ष माधबी पुरी बुच व त्यांचे पती धवल यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, बुच यांनी हे आरोप निराधार आणि चारित्र्यहनन करणारे असल्याचं म्हटलंय. तर, बुच यांनी वेळोवेळी संबंधित माहिती दिलेली असून संभाव्य हितसंबंधांचा मुद्दा विचारात घेऊन अशा प्रकरणांपासून त्यांनी स्वत:ला वेगळं ठेवलं, असं ‘सेबी’नं स्पष्ट केलंय. अदानी समूहानंही सर्व दावे खोडून काढले आहेत.

टॅग्स :सेबीगौतम अदानीअदानीशेअर बाजार