नवी दिल्ली : बंदीनंतर तब्बल पाच महिन्यांनी ‘मॅगी नूडल्स’ भारतातील काही निवडक बाजारपेठेतील दुकानांत परतली असून आठ राज्ये वगळता इतर ठिकाणीही टप्प्याटप्प्यात मॅगी आणण्याची नेस्ले इंडिया तयारी करीत आहे.
निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक शिसे आढळल्यावरून मॅगी नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नेस्ले इंडियाला ५३० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. भारतीय अन्नपदार्थ सुरक्षा प्रमाण प्राधिकरणाविरुद्ध दावा दाखल करण्याची शक्यताही कंपनीने नाकारलेली नाही.
तीनशे वितरकांमार्फत १०० शहरांत पुन्हा मॅगी उतरविण्यात आली असून येत्या काही दिवसात आणखी काही भागात मॅगी उपलब्ध केली जााईल, असे नेस्ले इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनी सांगितले.
गेले काही महिने कठीण गेले. निवडक बाजारात पुन्हा मॅगी आणून आम्ही गुणवत्ता, सुरक्षा आणि विश्वसनीयतेच्या दृष्टीने खरे असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशातहत सरकारमान्य तीन प्रयोगशाळांतील चाचणीत नेस्लेचे हे उत्पादन मापदंडावर खरे उतरले. झटपट तयार होणाऱ्या नूडल्सवर एफएसएसएआयने घातलेली बंदी न्यायालयाने आॅगस्टमध्ये हटविली होती. एफएसएसएआयने जूनमध्ये कंपनीवर बंदी घातली होती. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात शिसे आढळल्याचे एफएसएसएआयने म्हटले होते. त्यानंतर कंपनीने हे उत्पादन बाजारातून मागे घेतले होते.
कंपनी एफएसएसएआयकडे भरपाई मागणार का? असे विचारले असता नारायणन यांनी सांगितले की, सध्या आम्ही ब्रँड तयार करण्यावर लक्ष देत आहोत. आता तरी आम्ही याबाबत असा काहीही विचार केलेला
नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
निवडक बाजारपेठांत मॅगी पुन्हा परतली!
बंदीनंतर तब्बल पाच महिन्यांनी ‘मॅगी नूडल्स’ भारतातील काही निवडक बाजारपेठेतील दुकानांत परतली असून आठ राज्ये वगळता इतर ठिकाणीही टप्प्याटप्प्यात मॅगी
By admin | Published: November 9, 2015 10:09 PM2015-11-09T22:09:20+5:302015-11-09T22:09:20+5:30