Join us  

मॅजिक मोमेंट, 8PM... कोण तयार करतं प्रसिद्ध व्हिस्की ब्रँड; ८० वर्षांच्या अब्जाधीशाकडे आहे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 10:34 AM

Radico Khaitan Owner Lalit Khaitan journey : रेडिको खेतान हे देशातील मद्य निर्मिती क्षेत्रातील मोठं नाव आहे. ही कंपनी भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी ब्रूइंग कंपनी आहे.

ललित खेतान यांच्या नेतृत्वाखाली रेडिको खेतान (Radico Khaitan) हे देशातील मद्य निर्मिती क्षेत्रातील मोठं नाव आहे. ही कंपनी भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी ब्रूइंग कंपनी आहे. मॅजिक मोमेंट्स, 8PM प्रीमियम व्हिस्की, रामपूर इंडियन सिंगल मॉल्ट व्हिस्की आणि रिगल टॅलॉन व्हिस्की सारखे ब्रँड त्यांचे आहेत. या प्रसिद्ध ब्रँड्ससह कंपनी ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. कंपनीचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. तर त्यांचं बाजार भांडवल सुमारे २३ हजार कोटी रुपये आहे.

८० व्या वर्षी श्रीमंतांमध्ये समावेश

१९७२-७३ मध्ये कंपनीची सूत्रं हाती घेतलेल्या ललित खेतान यांनी अनेक चढउतारांवर मात केली आहे. वयाच्या ८० व्या वर्षी ते १ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक ठरले आहेत. हॅप्पीनेस इन अ बॉटल जिन सारख्या नवीन उत्पादनांमुळे आणि वाढलेल्या विक्रीमुळे गेल्या वर्षी कंपनीच्या शेअरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

युनायटेड स्पिरिट्सकडून कडवी स्पर्धा

हे यश मिळूनही रॅडिको खेतानला युनायटेड स्पिरिट्सकडून कडवी टक्कर मिळत आहे, ही निराळी बाब आहे. युनायटेड स्पिरिट्स ही डियाजिओची लिस्डेट सब्सिडायरी कंपनी आहे. यापूर्वी या कंपनीचं नेतृत्व विजय मल्ल्याकडे होतं. विजय मल्ल्या भारतातून पळून गेला आणि तो सध्या लंडनमध्ये राहतो.

कंपनीला मिळवून दिलं यश

ललित खेतान यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी चालवली आहे. त्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. हॅप्पीनेस इन अ बॉटल जिनसारखी नवीन उत्पादनं लॉन्च केल्यानं आणि विक्री वाढल्यानं कंपनीला फायदा झाला आहे. ८० वर्षीय ललित खेतान हे भारतातील नवे अब्जाधीश म्हणूनही ओळखले जातात.

टॅग्स :व्यवसाय