Join us

व्हॅक्सिन किंग पूनावाला यांच्या 'या' कंपनीचे 13 कोटी रुपये जप्त, सेबीनं MD सह 8 जणांवर घातली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 3:25 PM

नियामक प्रणालीमध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये, कंपनीच्या शेअर्ससंदर्भात इनसायडर ट्रेडिंग संबंधित अलर्ट मिळाला होता. त्याच वेळी पूनावाला समूहच्या राइझिंग सन होल्डिंग प्रायव्हेट लि. द्वारे मॅग्मा कॉर्पमध्ये कंट्रोलिंग स्टेकचे अधिग्रहणदेखील जाहीर करण्यात आले होते.

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (Sebi) पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा आणि इतर 7 संस्थांवर सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यापार करण्यास बंदी घातली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये इनसाइडर ट्रेडिंगसाठी या युनिट्सवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. पूर्वी या कंपनीचे नाव मॅग्मा फिनकॉर्प होते. या शिवाय, नियामकाने जारी केलेल्या अंतरिम आदेशात, 13 कोटी रुपयांची चुकीच्या पद्धतीने केलेली कमाई जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

नियामक प्रणालीमध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये, कंपनीच्या शेअर्ससंदर्भात इनसायडर ट्रेडिंग संबंधित अलर्ट मिळाला होता. त्याच वेळी पूनावाला समूहच्या राइझिंग सन होल्डिंग प्रायव्हेट लि. द्वारे मॅग्मा कॉर्पमध्ये कंट्रोलिंग स्टेकचे अधिग्रहणदेखील जाहीर करण्यात आले होते. या अलर्टनंतर सेबीने या प्रकरणाची चौकशी केली होती. पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविड -19 लस कोविशील्ड तयार केली आहे.

यांच्यावर घालण्यात आलीय बंदी -भुतडा व्यतिरिक्त सौमिल शहा, सुरभी किशोर शहा, अमित अग्रवाल, मुरलीधर अग्रवाल, राकेश राजेंद्र भोजगढिया, राकेश राजेंद्र भोजगढिया एचयूएफ आणि अभिजित पवार यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

या कंपनीचा 60 टक्के भाग केला खरेदी -अदर पूनावाला-नियंत्रित राइझिंग सन होल्डिंग्ज नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीने (NBFC) मॅग्मा फिनकॉर्पमध्ये 60 टक्के हिस्सा खरेदी केला होता. पूनावाला फायनान्स ही पूनावाला कुटुंबाच्या मालकीची एक फायनान्स कंपनी आहे. या कंपनीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची मालकी आणि नियंत्रण आहे. अदर पूनावाला कंपनीचे चेअरमन -जूनमहिन्यात MFL कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये मोठा बदल करण्यात आला. व्हॅक्सिन किंग अदर पूनावाला यांना या कंपनीचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याच बरबोर विजय देशवाल यांना कंपनीचे CEO म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी ते ICICI बँकेचे बिझनेस हेड होते. याच बरोबर अभय भटाडू यांना कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

टॅग्स :अदर पूनावालाकोरोनाची लसशेअर बाजार