Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला सौर कृषी पंप देणार, अजित पवारांची घोषणा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला सौर कृषी पंप देणार, अजित पवारांची घोषणा

Maharashtra Assembly Budget Session : अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:41 PM2024-02-27T15:41:40+5:302024-02-27T15:43:48+5:30

Maharashtra Assembly Budget Session : अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहे.

Maharashtra Assembly Budget Session Live Updates : Finance Minister Ajit Pawar Announced For Farmers, solar agriculture pump | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला सौर कृषी पंप देणार, अजित पवारांची घोषणा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला सौर कृषी पंप देणार, अजित पवारांची घोषणा

Maharashtra Assembly Budget Session : (Marathi News) मुंबई : राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. यावेळी अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहे. यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत पाच लाख 50 हजार नवीन सौर्य कृषी पंप बसवण्यात येणार आहेत.

याचबरोबर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोठी 1691 कोटी 47 लाख अनुदान प्रदान करण्यात आलेले आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये 1 रुपया पीकविमा योजनेतून 50 लाथ 1 हजार शेतकरी अर्जदारांना 2268 कोटी 43 लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या 6000 कोटी रुपये किंमतीच्या पहिल्या टप्प्यात मान्यता देण्यात आलेली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी काय महत्वाच्या घोषणा केल्या? जाणून घ्या.... 

- शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट.
- शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषि पंप” ही नवीन योजना- ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप.
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये.
- अटल बांबू लागवड योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे.
-  जलयुक्त शिवार  5700 गावांना एक लाख 59 हजार 886 कामांना मंजुरी
- पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 235 कोटी वनविभागास 2507 कोटी, मृदा व जलसंधारण विभागास 4247 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. 
- सन 2030 पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 40% ऊर्जा अपारंपारिक पद्धतीने निर्माण करण्याचे उद्दिष्ट.
- जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 700 गावांमधील 1 लाख 59 हजार 886  कामांना मंजूरी.
- राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर उर्जीकरण.
- “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये 
- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या 6 हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता
- सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता कृषी विभागास 3 हजार 650 कोटी रुपये, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागास 555 कोटी रुपये फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये नियतव्यय 
- सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता मदत व पुर्नवसन विभागाला 638 कोटी रुपये नियतव्यय 
- 39 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करुन 2 लाख 34 हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणार
- बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प  पूर्ण  झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प पूर्ण होणार 
- राज्यात रुप टॉप सोलार योजना राबवण्यात येत असून केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
- एक रुपयात पिक विमा योजनेतून 50 लाख १ लाख शेतकरी अर्जदारांना 2268 कोटी 43 लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेली आहे.
- पशुधन अभियानांतर्गत शेळी, मेंढी, वराह, कुकुट व वैरण विषयक योजनांचा लाभ तुपालकांना मिळावा यासाठी 129 प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे.
- यंदा राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ 1245 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आले आहेत.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3825 कोटी रुपयांचा रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे.
- विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करता जुलै 2000 पासून 12769 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे.
- सन 2024 25 वर्ष साठी कार्यक्रम करता करता मदत पुनर्वसन विभागास 668 कोटी रुपयांचा प्रस्तावित आहे.

Web Title: Maharashtra Assembly Budget Session Live Updates : Finance Minister Ajit Pawar Announced For Farmers, solar agriculture pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.