Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

राज्यातील महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करुन देण्याची मोठी घोषणा केली आहे. महिला सशक्तीकरणाासाठी राज्य सरकार नव्या योजना सुरू करत असल्याचेही पवार म्हणाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:17 PM2024-02-27T15:17:41+5:302024-02-27T15:19:11+5:30

राज्यातील महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करुन देण्याची मोठी घोषणा केली आहे. महिला सशक्तीकरणाासाठी राज्य सरकार नव्या योजना सुरू करत असल्याचेही पवार म्हणाले. 

Maharashtra assembly Interim Budget session 2024 Provide 5,000 pink rickshaws for women; Ajit Pawar's big announcement | महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget Session 2024 ( Marathi News ) :मुंबई-  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून  सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करुन देण्याची मोठी घोषणा केली आहे. महिला सशक्तीकरणाासाठी राज्य सरकार नव्या योजना सुरू करत असल्याचेही पवार म्हणाले. 

राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live : श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय, पर्यटकांना होणार फायदा

अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९ हजार १९३ कोटी रुपये, रोजगार हमी योजनेसाठी २ हजार २०५ कोटी रुपये, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

Web Title: Maharashtra assembly Interim Budget session 2024 Provide 5,000 pink rickshaws for women; Ajit Pawar's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.