Join us

Maharashtra assembly Interim Budget session 2024 : अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेसाठी विशेष तरतूद, १८ वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्यानं रक्कम मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 4:08 PM

Maharashtra assembly Interim Budget session 2024 : महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी त्यांनी लेक लाडकी योजनेसाठी करण्यात आलेल्या तरतूदीची माहिती दिली.

Maharashtra assembly Interim Budget session 2024 : महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. तसंच राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, यावेळी त्यांनी लेक लाडकी योजनेबाबत मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये या योजनेची सुरुवात केली होती.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत यात टप्प्याटप्प्यानं १ लाख १ हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या योजनेंतर्गत मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत करण्यात येणार आहे. 

ही योजना नेमकी आहे काय? 

या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, ११वीत गेल्यावर आठ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये अशा रीतीनं त्या मुलीला एकूण एक लाख एकहजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.   

कोणाला मिळणार फायदा? 

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. 

टॅग्स :विधानसभामहाराष्ट्र बजेट 2024अजित पवार