Lokmat Money > बिझनेस न्यूज > महाराष्ट्र, दिल्ली, यूपीत ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी

महाराष्ट्र, दिल्ली, यूपीत ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी

चालू वित्त वर्षासह गेल्या चार वर्षांत देशात १0.५ लाख ग्राहक तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील ४0 टक्के तक्रारी महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांतील आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:59 AM2018-08-09T03:59:33+5:302018-08-09T03:59:41+5:30

चालू वित्त वर्षासह गेल्या चार वर्षांत देशात १0.५ लाख ग्राहक तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील ४0 टक्के तक्रारी महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांतील आहेत.

Maharashtra, Delhi, UP consumer complaints | महाराष्ट्र, दिल्ली, यूपीत ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी

महाराष्ट्र, दिल्ली, यूपीत ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी

- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : चालू वित्त वर्षासह गेल्या चार वर्षांत देशात १0.५ लाख ग्राहक तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील ४0 टक्के तक्रारी महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांतील आहेत.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर उत्तर प्रदेशातून १.४९ लाख तक्रारी आल्या. दिल्लीतून १.४६ लाख, तर महाराष्ट्रातून १.४२ लाख तक्रारी आल्या. महाराष्ट्रातील तक्रारींचे प्रमाण २0१७-१८मध्ये तिप्पट वाढून ६३,१३५ झाले. २0१५-१६मध्ये ही संख्या २१,६९६ होती. उत्तर प्रदेशातील तक्रारी अडीच पट वाढून ६२,९0१, तर दिल्लीत दुप्पट वाढून ५८,0४७ झाल्या. २0१५-१६ आणि २0१६-१७मध्ये उत्तर प्रदेश आणि दिल्लीत जास्त तक्रारी आल्या. २0१७-१८मध्ये महाराष्ट्रात तक्रारी वाढल्या.
ग्राहकांच्या तक्रारी वाढत असल्याचे ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी संसदेत मान्य केले.
तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, तसेच १८00-११-४000 हा शुल्क मुक्त क्रमांकही सुरू करण्यात आला आहे, असे पासवान यांनी सांगितले.
आकडेवारीनुसार, ई-कामर्स क्षेत्रात तक्रारी गतीने वाढत आहेत. या क्षेत्रात २0१५-१६मध्ये २८,३३१ तक्रारी असताना २0१७-१८मध्ये त्या ७८,0८८ वर गेल्या आहेत.
>राज्यनिहाय तक्रारी
राज्य २0१५-१६ २0१६-१७ २0१७-१८ २0१८-१९ एकूण
(३0 जूनपर्यंत)
उत्तर प्रदेश २९५६२ ४२२१७ ५८0४७ १६२९३ १४६१२0
दिल्ली २५३८८ ४२१४७ ६२९0१ १८६८0 १४९११६
महाराष्ट्र २१६९६ ३९४७७ ६३१३५ १८४२२ १४२७३0
संपूर्ण भारत १७२५५८ २९८५८९ ४५४९0४ १३0८८२ १0५६९३३

Web Title: Maharashtra, Delhi, UP consumer complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल