Join us

महाराष्ट्र पुरवतोय देशाला पैसा! जीएसटी संकलनात टॉप-३ मध्ये; गोव्याचे संकलन ३२ टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 7:50 AM

Maharashtra Economy: गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात २४ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक जीएसटी संकलनाच्या बाबतीत केरळ आणि कर्नाटक या राज्यांसोबत महाराष्ट्राचा क्रमांक टॉप-३ राज्यांत लागला आहे.

- हरीष गुप्तानवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात २४ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक जीएसटी संकलनाच्या बाबतीत केरळ आणि कर्नाटक या राज्यांसोबत महाराष्ट्राचा क्रमांक टॉप-३ राज्यांत लागला आहे. गोव्याच्या जीएसटी संकलनात सर्वाधिक ३२% वाढ झाली आहे. कर्नाटकातील वाढ २९ टक्के, तर केरळातील २६% राहिली.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये १५,१७५ कोटी रुपये असलेले महाराष्ट्राचे जीएसटी संकलन ऑगस्ट २०२२ मध्ये वाढून १८,८६३ कोटी रुपये झाले. जीएसटी संकलनातील वार्षिक आधारावरील राष्ट्रीय वृद्धी २८ टक्के राहिली. 

कोरोना साथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे संकटात आलेली अर्थव्यवस्था आता सुधारत असल्याचे संकेत जीएसटी संकलनातील वाढीतून मिळत आहेत. उत्तर प्रदेशसारख्या काही मोठ्या राज्यांच्या जीएसटी संकलनातील वृद्धी मंद राहिली. उत्तर प्रदेशातील वृद्धी १४ टक्के, बिहारातील २३ टक्के आणि पश्चिम बंगालमधील वृद्धी २५ टक्के राहिली.

सलग ६ महिन्यांत रेकॉर्डब्रेकमागील सलग ६ महिन्यांत जीएसटीचा महसूल १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे. या वर्षी ऑगस्ट २०२२ पर्यंत मागच्या वर्षीच्या तुलनेत जीएसटी महसुलातील वृद्धी मजबूत राहिल्याचे दिसून आले. आर्थिक पुनरुत्थान आणि अनुपालनाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा हा परिणाम आहे.

सप्टेंबरमध्ये २०%पेक्षा अधिक राहणार वृद्धीआयसीआरएच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२२ मध्ये संकलन २०%च्या वर राहण्याची शक्यता आहे. 

 संकलनातील वाढगोवा     ३२%कर्नाटक     २९%केरळ     २६%प. बंगाल     २५%महाराष्ट्र     २४%उत्तर प्रदेश     १४%बिहार     २३%राष्ट्रीय वाढ    २८%

सरकारच्या तिजोरीत  किती जमा झाले?संपूर्ण देशाचे जीएसटी संकलन १,४३,६१२ कोटी रुपये राहिले. त्यात सीजीएसटीचा वाटा २४,७१० कोटी, एसजीएसटीचा वाटा ३०,९५१ कोटी, आयजीएसटीचा वाटा ७७,७८२ कोटी आणि उपकराचा वाटा १०,१६८ कोटी रुपये राहिला. ऑगस्ट २०२१ मधील जीएसटी संकलन १,१२,०२० कोटी रुपये होते. या वर्षात ऑगस्ट २०२२ पर्यंतची वृद्धी ३३ टक्के राहिली. जुलैच्या तुलनेत घसरणजुलैमधील १.४९ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत मात्र ऑगस्टमधील जीएसटी संकलन कमी राहिले आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक १.६७ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. अर्थव्यवस्थेत सुधारणा?केपीएमजी इन इंडियाचे भागीदार अभिषेक जैन यांनी सांगितले की, कोविडच्या चढ-उतारानंतरही भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा झाल्याचे संकेत जीएसटीच्या ताज्या आकडेवारीतून मिळतात.का वाढले संकलन?एन ए शाह असोसिएट्सचे भागीदार पराग मेहता यांनी सांगितले की, अधिक चांगले अनुपालन आणि जुलै २०२२ मध्ये काढून टाकण्यात आलेल्या विविध सवलती यांचा परिणाम वाढीव जीएसटी संकलनात दिसून येत आहे. सणासुदीच्या हंगामामुळे आगामी २ ते ३ महिन्यांत संकलनात आणखी वाढ होऊ शकते.

टॅग्स :महाराष्ट्रमुंबईअर्थव्यवस्थाजीएसटी