Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी चोरीत महाराष्ट्र आघाडीवर, कर चोरीत होतेय दिवसेंदिवस वाढ

जीएसटी चोरीत महाराष्ट्र आघाडीवर, कर चोरीत होतेय दिवसेंदिवस वाढ

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) चोरीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 02:54 PM2023-11-01T14:54:38+5:302023-11-01T14:54:53+5:30

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) चोरीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे.

Maharashtra leads in GST evasion tax evasion is increasing day by day know details | जीएसटी चोरीत महाराष्ट्र आघाडीवर, कर चोरीत होतेय दिवसेंदिवस वाढ

जीएसटी चोरीत महाराष्ट्र आघाडीवर, कर चोरीत होतेय दिवसेंदिवस वाढ

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) चोरीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यात २०१८-१९ पासूनच्या ५ वर्षांत जीएसटी चुकवेगिरीच्या ३,५३१ घटना उघडकीस आल्या. त्यातून ६२,०५१ कोटी रुपयांची कर चोरी झाली. याशिवाय कर चोरांकडून २७,१७८ कोटी रुपये वसूलही करण्यात आले आहेत. ही देशातील सर्वाधिक वसुली आहे. 

२०१८-१९ मध्ये जीएसटी अधिकाऱ्यांनी ७,३९४ कोटी रुपयांची वसुली केली. त्यापुढील वर्षी हा आकडा घसरून ४,८७९ कोटी रुपये झाला. २०२०-२१ मध्ये २,९०५ कोटी, २०२१-२२ मध्ये ५,४१३ कोटी आणि २०२२-२३ मध्ये ६,५८७ कोटी रुपयांची वसुली झाली. या ५ वर्षांच्या काळात ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील कर चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. २०१८-१९ मध्ये ३८,००० कोटी रुपयांची जीएसटी चोरी झाली आहे. २०२२-२३ मध्ये हा आकडा वाढून १.३१ लाख कोटी रुपये झाला, तर २०२२-२३ सालामध्ये कर चोरांकडून सर्वाधिक ३३ हजार २२६ कोटी रुपयांची वसुलीही झाली आहे. 

कर चाेरीबाबत सूत्रांनी सांगितले की, ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ५ वर्षांत एकूण कर संकलन १.०८ लाख कोटी रुपये राहिले. ते कर चोरी झालेल्या ३.३३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ३३ टक्के आहे. २०२३-२४ मध्ये ५० हजार कोटी रुपयांच्या कर चोरीची वसुली होईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. २०२२-२३च्या तुलनेत हा आकडा दुपटीपेक्षा अधिक आहे.

Web Title: Maharashtra leads in GST evasion tax evasion is increasing day by day know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.