Join us  

राज्य बँकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी ५१ लाखांची मदत; उद्धव ठाकरेंकडे धनादेश सुपूर्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 9:24 PM

सामाजिक बांधिलकीतून राज्य सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रुपये १ कोटी ५१ लाखांचा निधी दिला आहे.

मुंबई: देशावर कोरोनाचे संकट कायम असताना राज्यात महापूर, निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ यांसह अनेक नैसर्गिक संकटे अली. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळुन आणि पुरामुळे राज्याच्या अनेक भागात जनतेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दरडीखाली लोकांची घरे नाहीशी झाली तर काही भागात पुराच्या पाण्याखाली घर बुडाल्याने ते घर गाळाने भरुन गेले, घरातील चीज वस्तु सर्व नामशेष झाले. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून राज्य सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रुपये १ कोटी ५१ लाखांचा निधी दिला आहे. (maharashtra state co op bank donate 1 crore 51 lakh to chief minister relief fund) 

मेडिकल, केमिकल क्षेत्रात गुंतवणुकीची संधी! ‘या’ २ कंपन्यांचे IPO येतायत, केवळ २ दिवसांची मुदत

राज्य शासनावर या लोकांना हर प्रकारे मदत करुन त्यांनी पुन्हा जीवनात उभे करण्याची व तेथील सुव्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या छोटेखानी समारंभात राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी १ कोटी ५१ लाखांचा निधीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. 

याला म्हणतात भन्नाट रिटर्न! १० हजारांच्या SIP चे झाले १.०८ कोटी; ‘या’ फंडाची दमदार कामगिरी

अनेक मुद्दयांवर सुमारे तासभर सखोल चर्चा 

यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अजित देशमुख, सरव्यवस्थापक दिलीप दिघे आणि अनंत भुईभार उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांचेशी बँकेशी निगडीत अनेक मुद्दयांवर सुमारे तासभर सखोल चर्चा केली आणि बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

भन्नाट! Jio नंतर आता Google करणार Airtel मध्ये हजारो कोटींची गुंतवणूक; करार पूर्ण?

दरम्यान, ३१ मार्च २०२१ अखेरीस आर्थिक वर्षात बॅंकेची वार्षिक उलाढाल रुपये ४३६०२ कोटींची असून, बँकेने ३६४ कोटीचा निव्वळ नफा कमावला आहे. बँकेच्या ठेवी २०३०८ कोटी रुपयांच्या असून कर्जे रुपये २३२९५ कोटींची कर्जे असून बँकेच्या अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण १.२० टक्के इतके आहे. 

टॅग्स :बँकराज्य सरकारउद्धव ठाकरे