विश्वास पाटील, कोल्हापूर
महाराष्ट्र उद्योगात देशात पुढे आहे की नाही, हा अलीकडील काळातील वादाचा मुद्दा ठरला असला तरी तो रोजगारात मात्र देशात सगळ््यात पुढे असल्याची माहिती सहाव्या आर्थिक गणनेतून पुढे आली आहे. या गणनेचे अस्थायी निष्कर्ष राज्याचे अप्पर गणना आयुक्त ए. डी. देव यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार राज्यात आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींची संख्या १४३.८ लाख (देशाच्या तुलनेत ११.३ टक्के) आहे. आस्थापनांच्या संख्येत मात्र कोल्हापूरने सगळ््यांना मागे टाकले असून या जिल्ह्यात५ लाख ७० हजार आस्थापना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक साधनांच्या आधारे २०११ मध्ये केलेल्या सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेचे निष्कर्ष ३ जुलैला जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर गतवर्षी झालेल्या आर्थिक गणनेचे निष्कर्ष काय आहेत, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला. त्यानुसार ही माहिती उपलब्ध झाली. भारत सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत आर्थिक गणना नियतकालिक पद्धतीने घेण्यात येते व त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होते. सहाव्या आर्थिक गणनेत शेतकी व बिगर शेतकी कार्य करणाऱ्या आस्थापनांची (पीक उत्पादने, लागवड, सार्वजनिक उपक्रम, संरक्षण आणि अनिवार्य सामाजिक सुरक्षा वगळून) गणना करण्यात आली. हे काम आॅक्टोबर २०१३ ते एप्रिल २०१४ या कालावधीत झाले. या गणनेमध्ये हातमाग व हस्तव्यवसाय आस्थापनांची माहिती प्रथमच गोळा करण्यात आली.
या गणनेचे निष्कर्ष असे : १) पाचव्या आर्थिक गणनेच्या (२००५) तुलनेत राज्यातील एकूण रोजगारात ३६.५ टक्के वाढ झाली असून ती देशपातळीवर ३४.४ टक्के इतकी आहे. २) राज्यातील आस्थापनांची एकूण संख्या ६१.३ लाख(देशाचा विचार करता १०.५ टक्के) राज्याचा उत्तर प्रदेश(११.४८)नंतर दुसरा क्रमांक लागतो. ३) पाचव्या आर्थिक गणनेच्या तुलनेत (२००५) राज्यात आस्थापनांच्या संख्येत ४७.५ टक्के वाढ. देशपातळीवर ही ४१.७ टक्के वाढ. ४) राज्यात ५७.३ टक्के आस्थापना ग्रामीण भागात. देशपातळीवर हे प्रमाण ५९.९ टक्के ५) महाराष्ट्रात २.१ टक्के आस्थापना हातमाग व हस्तव्यवसायांशी संबंधित. देशपातळीवर हेच प्रमाण ३.८ टक्के. ६) राज्यातील ४६ टक्के रोजगार ग्रामीण भागात असून देशपातळीवर हे प्रमाण ५१.९ टक्के आहे. ७) राज्यात ४९.८ वेतनी कामगार असून देशात हे प्रमाण ४५.७ टक्के आहे. ८) राज्यात २२.९ टक्के महिला कामगार असून देशपातळीवर हे प्रमाण २५.६ टक्के.
कोल्हापूर का पुढे..
> कोल्हापुरात ग्रामीण आस्थापनांच्या संख्येत वाढ झाली आहे, त्याचे कारण हे की यावेळेच्या गणनेत शेतीवर आधारित आस्थापनांची मोजदाद करण्यात आली. या जिल्ह्णात ‘गोकुळ’सह सहकारी दूध व्यवसायाचे मोठे नेटवर्क आहे.
४प्रत्येक कुटुंबात सरासरी दोन म्हशी आहेत व त्यावर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अशा कुटुंबांना ‘आस्थापना’ म्हणून ओळख मिळाल्याने कोल्हापूर राज्यात पुढे आहे.
> राज्यातील आस्थापनांची जिल्हानिहाय तुलना केली असता बृहन्मुंबई(मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा)मध्ये आस्थापनांची संख्या ७.३ लाख (१२ टक्के) असून काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या २७.३ लाख (१९ टक्के) आहे.
> बृहन्मुंबई वगळून राज्यात आस्थापनांच्या संख्येत कोल्हापूर (५.७ लाख) आघाडीवर असून त्या खालोखाल पुणे (५ लाख) तर काम करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत पुणे (१६.२ लाख) आघाडीवर आहे. त्याखालोखाल ठाणे (१३.९ लाख) आहे.
> ग्रामीण भागात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या राज्यात ५६ टक्के व नागरी भागात २३.५ टक्क्यांनी वाढली आहे. देशपातळीवर हीच संख्या अनुक्रमे ३१.६ व ३७.५ टक्क्यांनी वाढली आहे. शेती उद्योगाची स्वतंत्र गणना झाल्याने ग्रामीण आस्थापनांची टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
४राज्यात कार्यरत महिलांची टक्केवारी ग्रामीण व नागरी भागात अनुक्रमे २७.८ टक्के व १८.८ टक्के आहे. देशपातळीवर हेच प्रमाण ३०.९ व १९.८ टक्के आहे.
रोजगारात महाराष्ट्र देशात अव्वल
महाराष्ट्र उद्योगात देशात पुढे आहे की नाही, हा अलीकडील काळातील वादाचा मुद्दा ठरला असला तरी तो रोजगारात मात्र देशात सगळ््यात पुढे असल्याची माहिती सहाव्या आर्थिक गणनेतून पुढे आली आहे.
By admin | Published: July 6, 2015 11:03 PM2015-07-06T23:03:50+5:302015-07-06T23:03:50+5:30