Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी संकलनात देशात महाराष्ट्र अव्वल!, एक लाख ६८ हजार कोटींचे देशात झाले संकलन

जीएसटी संकलनात देशात महाराष्ट्र अव्वल!, एक लाख ६८ हजार कोटींचे देशात झाले संकलन

महाराष्ट्राचा वाटा २७ हजार कोटींचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 09:08 AM2022-05-02T09:08:13+5:302022-05-02T09:09:25+5:30

महाराष्ट्राचा वाटा २७ हजार कोटींचा 

Maharashtra tops the country in GST collection One lakh 68 thousand crore was collected in the country | जीएसटी संकलनात देशात महाराष्ट्र अव्वल!, एक लाख ६८ हजार कोटींचे देशात झाले संकलन

जीएसटी संकलनात देशात महाराष्ट्र अव्वल!, एक लाख ६८ हजार कोटींचे देशात झाले संकलन

नवी दिल्ली : देशात जीएसटी (वस्तू व सेवा कर) संकलनाने एक लाख ६८ हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला असून, यामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनापोटी सरकारी खजिन्यात एक लाख ६८ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. या संकलनामधे महाराष्ट्राचे योगदान २७ हजार ४९५ कोटी रुपयांचे आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक (११,८२० कोटी) आणि त्यानंतर गुजरात (११,२६४ कोटी) यांचा क्रमांक आहे. सन २०२१ मध्ये महाराष्ट्रात २२,०१२ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. त्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. 

मार्च, २०२२ या महिन्यांत एक लाख ४२ हजार कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात संकलनाच्या रकमेत २५ हजार कोटी रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. 

सलग दहाव्यांदा जीएसटी संकलनाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेला लागलेले ग्रहण आता सुटण्याचे संकेत या वाढत्या आकडेवारीतून मिळत आहेत. दरम्यान, मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाद्वारे सरकारी खजिन्यात १५ लाख कोटी रुपयांच्या आसपास रक्कम जमा झाली होती, तर मार्च, २०२१ मध्ये संकलनाचा हाच आकडा १२ लाख कोटी रुपये इतका होता. 

प्रमुख राज्ये आणि कर संकलन
१) महाराष्ट्र - २७,४९५ कोटी
२) कर्नाटक - ११,८२० कोटी
३) गुजरात -११,२६४ कोटी
४) तामिळनाडू - ९,७२४ कोटी
५) उत्तर प्रदेश - ८,५३४ कोटी

Web Title: Maharashtra tops the country in GST collection One lakh 68 thousand crore was collected in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.