मुंबई : राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर येत असून, वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात प्रत्येक महिन्यात वाढ होत आहे. जानेवारीत या करापोटी २० हजार ७०० कोटींचे संकलन झाले असून, गेल्या महिन्याच्या (डिसेंबर) तुलनेत यात १,२४८ कोटींची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षांत राज्यात जानेवारीपर्यंत १ लाख ७८ हजार कोटींचे एकूण संकलन झाले आहे.
वस्तू आणि सेवा करातून देशाचा आर्थिक गाडा कसा हाकला जात आहे हे लक्षात येते. जीएसटी हा राज्यांकडून केंद्राला येणारा महत्त्वाचा महसूल आहे. जानेवारी महिन्यात देशात विक्रमी १ लाख ४० हजार कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. महाराष्ट्राच्या जीएसटी संकलनातही प्रत्येक महिन्यात वाढ होत असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत ही ३५ टक्के वाढ आहे. जानेवारी २०२१च्या तुलनेत जानेवारी २०२२ मध्ये जानेवारीमध्ये जीएसटी संकलनात १५ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये १७ हजार ९६७ कोटी रुपयांचे जीएसटी कर संकलन झाले होते. जानेवारी २०२२ मध्ये त्यात २० हजार ७०४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटी कर अधिकाऱ्यांनी ठाणे येथे नुकतीच १२.२३ कोटींची बनावट बिले तयार करून फसवणूक दाम्पत्याला अटक करून ताब्यात घेतले होते.
बनावट जीएसटी बिले तयार करणाऱ्यांविरोधात कारवाई -
राज्याने चालू आर्थिक वर्षांत १ लाख ७८ हजार कोटींचे जीएसटी कर संकलन केले असून, गेल्यावर्षी १ लाख ३२ हजार कोटी रुपयांचे संकलन झाले होते. आर्थिक विकासदरामध्ये होत असलेली वाढ आणि बनावट जीएसटी बिले तयार करणाऱ्यांविरोधात सुरू असलेली कारवाई यामुळे जीएसटी संकलनात वाढ होत असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
कर संकलन
- राज्याचे एकूण कर संकलन
(जानेवारीपर्यंत) : १ लाख ७८ लाख कोटी
- डिसेंबर २०२१ च्या तुलनेत जानेवारी २०२२ मध्ये कर संकलनात १,२४८ कोटींची वाढ
- कर संकलात वाढ : ३५ टक्के
- एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान झालेले कर संकलन : १.३२ लाख कोटी
- एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान झालेले कर संकलन : १.७८ लाख कोटी