Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'महारत्न' कंपन्यांनी भरली सरकारची झोळी, दिला हजारो कोटींचा डिविडेंड; कोणत्या कंपनीनं किती दिला?

'महारत्न' कंपन्यांनी भरली सरकारची झोळी, दिला हजारो कोटींचा डिविडेंड; कोणत्या कंपनीनं किती दिला?

Maharatna Company: जून तिमाहीत लाभांश जाहीर करणाऱ्या कंपन्यांकडून आता तो सरकारला दिला जात आहे. पाहा कोणत्या कंपन्यांनी किती कोटींची रक्कम सरकारला दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 03:39 PM2024-09-14T15:39:57+5:302024-09-14T15:43:37+5:30

Maharatna Company: जून तिमाहीत लाभांश जाहीर करणाऱ्या कंपन्यांकडून आता तो सरकारला दिला जात आहे. पाहा कोणत्या कंपन्यांनी किती कोटींची रक्कम सरकारला दिली.

Maharatna companies gave dividends of thousands of crores Which company paid how much know details | 'महारत्न' कंपन्यांनी भरली सरकारची झोळी, दिला हजारो कोटींचा डिविडेंड; कोणत्या कंपनीनं किती दिला?

'महारत्न' कंपन्यांनी भरली सरकारची झोळी, दिला हजारो कोटींचा डिविडेंड; कोणत्या कंपनीनं किती दिला?

Maharatna Company: जून तिमाहीत लाभांश जाहीर करणाऱ्या कंपन्यांकडून आता तो सरकारला दिला जात आहे. दीपमनं दिलेल्या माहितीनुसार एनटीपीसी अर्थात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशननं लाभांश म्हणून सरकारी तिजोरीत १६१० कोटी रुपये जमा केले आहेत. याशिवाय कोल इंडियानं सरकारी तिजोरीत लाभांश म्हणून १९४५ कोटी रुपये दिले आहेत. दोन्ही कंपन्यांनी मिळून ३५५५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले आहेत.

NTPC चा डिविडेंड यील्ड २% आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदारानं एनटीपीसीच्या शेअरमध्ये १० हजार गुंतवले तर त्याला एका वर्षात डिविडेंडच्या रुपात २०० रुपयांच्या जवळपास मिळतील. याचा डिविडेंड पे आऊट रेश्यो ३९.५% आहे. म्हणजे कंपनी आपल्या नफ्याच्या ४० टक्के डिविडेंडच्या रुपात शेअरहोल्डर्समध्ये वाटते. 

Coal India चा डिविडेंड यील्ड ५.२५% आहे. याचाच अर्थ जर एखाद्यानं या स्टॉकमध्ये १० हजार गुंतवले असतील तर त्याला प्रत्येक वर्षी डिविडेंडच्या रुपात ५२५ रुपयांच्या जवळपास मिळतील.

यांनीही दिला डिविडेंड 

दीपमनं दिलेल्या माहितीनुसार, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशननंही सरकारी तिजोरीत १३१३ कोटी रुपये जमा केले आहेत. यापूर्वी पीएफसी म्हणजेच पॉवर फायनान्स कंपनीनं ६०१ कोटी रुपये, कॉनकॉरनं ६८ कोटी रुपये आणि राइट्स लिमिटेडकडून ४३ कोटी रुपये लाभांश म्हणून देण्यात आले होते.

Web Title: Maharatna companies gave dividends of thousands of crores Which company paid how much know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.