पथर्डी(जि. अहमदनगर) : जय मातादीच्या जयघोषात आणि मंत्रोच्चारात मोहटादेवी गडावर घटस्थापना करण्यात आली़ देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले व दिवाणी न्यायाधीश शिवाजी केकाण व त्यांच्या पत्नीच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवासाठी बुधवारी रात्रीपासून मोहटा गडाकडे भाविकांची रिघ सुरू झाली होती़ गावोगावचे देवी मंडळे पेटती मशाल घेऊन वाजत गाजत देवीचा जयघोष करीत रस्त्याने जात होते. तर गुरुवारी मोहटा गडाहून दिवसभरात नाशिक, औरंगाबाद, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार देवी मंडळे मशाली घेऊन आपापल्या गावी घटस्थापनेसाठी रवाना झाले़ बुधवारी रात्रीपासून महिलांची मंडळे देवीचे गाणे म्हणत पायी गडावर येत होते.गुरुवारी सकाळी मोहटे गावातून देवीच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)
मोहटागडावर भाविकांची मांदियाळी ------------
पाथर्डी(जि. अहमदनगर) : जय मातादीच्या जयघोषात आणि मंत्रोच्चारात मोहटादेवी गडावर घटस्थापना करण्यात आली़ देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले व दिवाणी न्यायाधीश शिवाजी केकाण व त्यांच्या पत्नीच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली.
By admin | Published: September 25, 2014 11:04 PM2014-09-25T23:04:00+5:302014-09-25T23:04:00+5:30