Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटांवर महात्मा गांधीच राहणार

नोटांवर महात्मा गांधीच राहणार

सध्या भारताच्या चलनी नोटांवरील महात्मा गांधी यांचे चित्र बदलण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2016 04:24 AM2016-08-03T04:24:22+5:302016-08-03T04:24:22+5:30

सध्या भारताच्या चलनी नोटांवरील महात्मा गांधी यांचे चित्र बदलण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही

Mahatma Gandhi will remain on the notes | नोटांवर महात्मा गांधीच राहणार

नोटांवर महात्मा गांधीच राहणार


नवी दिल्ली : सध्या भारताच्या चलनी नोटांवरील महात्मा गांधी यांचे चित्र बदलण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही, तसेच अन्य नेत्यांचे छायाचित्र नोटांवर छापण्याचाही कोणताच प्रस्ताव नाही. केंद्र सरकारने राज्यसभेत मंगळवारी ही माहिती दिली.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या मुद्द्यावर विचार करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. सध्या नोटांवर असलेले महात्मा गांधी यांचे छायाचित्र बदलण्याची गरज नाही, असा निर्णय या समितीने दिला आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, कोणत्या नोटा चलनात आणायच्या याबाबत सरकार रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून वेळोवेळी निर्णय घेत असते. नोटांचे डिझाईन व सुरक्षा फिचर्स याबाबतचा निर्णयही सरकार रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून घेते. नोटा चलनात आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती उत्सवानिमित्ताने त्यांचे चित्र असलेली नोट अथवा नाणे काढण्याचा काही प्रस्ताव आहे का, या प्रश्नावर मेघवाल म्हणाले, डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे चित्र असलेले १२५ रुपयांचे एक बिगर चलनी नाणे व १0 रुपयांचे चलनी नाणे यापूर्वीच काढण्यात आले आहे. ६ डिसेंबर २0१५ रोजी त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते विमोचन करण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>समितीने सांगितले, छायाचित्र बदलू नका
सध्या नोटांवर असलेले महात्मा गांधी यांचे छायाचित्र बदलण्याची गरज नाही, असा निर्णय समितीने दिला आहे. समितीच्या निर्णयात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mahatma Gandhi will remain on the notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.