भारत आता सर्वत क्षेत्रात वेगानं प्रगती करत आहे. विशेषतः तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश वेगानं पुढे जात आहे. आधी बँकेच्या रांगेत उभं राहून तुमच्या खात्यातून पैसे काढायला लागायचे, मग एटीएम मशीन आली. बँकेत न जाता काही मिनिटांतच एटीएम मशीनमधून रोकड बाहेर पडू लागली. आता देशानं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. एटीएम कार्ड नसतानाही तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता. भारताची ही प्रगती पाहून महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रादेखील अतिशय खूश झाले आहेत.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्डची गरज नाही. देशातील पहिले व्हाईट लेव्हल UPI-ATM लाँच करण्यात आलं आहे. तुम्ही डेबिट कार्डशिवाय युपीआयद्वारे पैसे काढू शकाल. या नवीन सेवेचं आनंद महिंद्रा यांनी कौतुक केलंय. भारतातील डिजिटल वित्तीय सेवा ज्या वेगानं वाढत आहेत ते कौतुकास्पद आहे. डिजिटल सेवा आता कॉर्पोरेट केंद्रित न होता ग्राहककेंद्रित होत आहेत, असं आनंद महिंद्रा म्हणाले.
This UPI ATM was apparently unveiled at the Global Fintech Fest 2023 in Mumbai on September 5. The speed at which India is digitising financial services & making them consumer-centric as opposed to corporate-centric (Alarm bell for credit card companies?) is simply dazzling.… pic.twitter.com/krBXhbc9Qh
— anand mahindra (@anandmahindra) September 7, 2023
क्रेडिट कार्ड कंपन्यांचं टेन्शन वाढणार
एटीएमचा हा नवा शोध क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी एक नवी डोकेदुखी ठरू शकते असं महिंद्रा म्हणाले. त्यांनी युपीआय एटीएम सेवेचं कौतुकही करत फक्त मी माझा मोबाईल कुठे विसरायला नको, असंही त्यांनी म्हटलं.
हे कसं करतं काम
एटीएममधून पैसे काढण्यासाठी किती रक्कम हवी ते निवडा. निवडलेल्या रकमेशी संबंधित युपीआय क्युआर कोड दाखवला जाईल. ते स्कॅन करण्यासाठी तुमचं युपीआय अॅप वापरा. व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी तुमचा युपीआय पिन एंटर करा. त्यानंतर तुम्हाला तुम्ही एन्टर केलेली रक्कम मिळेल. तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही युपीआय सक्षम अॅप असल्यास तुम्ही हे करू शकाल.