Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिंद्रा-जिंदाल यांनी दिला झटका; जर इन्फोसिस, विप्रोनं मोठा निर्णय घेतला तर कॅनडाचं काय होणार?

महिंद्रा-जिंदाल यांनी दिला झटका; जर इन्फोसिस, विप्रोनं मोठा निर्णय घेतला तर कॅनडाचं काय होणार?

भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक तणावाचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवरही होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:48 AM2023-09-25T11:48:34+5:302023-09-25T11:50:08+5:30

भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक तणावाचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवरही होत आहे.

Mahindra Jindal strikes If Infosys Wipro take a big decision what will happen to Canada Justin Trudeau khalistan nijjar death comment | महिंद्रा-जिंदाल यांनी दिला झटका; जर इन्फोसिस, विप्रोनं मोठा निर्णय घेतला तर कॅनडाचं काय होणार?

महिंद्रा-जिंदाल यांनी दिला झटका; जर इन्फोसिस, विप्रोनं मोठा निर्णय घेतला तर कॅनडाचं काय होणार?

भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक तणावाचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवरही होत आहे. महिंद्रा समूह आणि जेएसडब्ल्यू स्टीलसारख्या बड्या कंपन्यांनी या प्रकरणी कॅनडाला आधीच मोठा धक्का दिला आहे. अशा परिस्थितीत टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस सारख्या बड्या आयटी कंपन्यांनीही जर कॅनडाला झटका देण्याचा निर्णय घेतला तर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेचं काय होईल याची कल्पनाही करता येणार नाही. याचा मोठा फटका कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो.

भारताशी पंगा कॅनडाच्या अंगलट, महिंद्रांनंतर जिंदाल यांनी दिला ‘जोर का झटका’

भारतीय आयटी कंपनी इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रोनं कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यासोबतच तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळत आहेत. अशात जर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला आणि कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला, चर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका लागू शकतो.

इन्फोसिसमध्ये ८ हजार नोकऱ्या 
भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसनं टोरंटो, कॅलगरी आणि कॅनडातील व्हँकुव्हर येथे आपली सेंटर्स सुरू केली आहेत. कॅनडामधील त्यांचं कामकाज हाताळण्यासाठी, इन्फोसिसनं त्यांच्या अमेरिकन युनिट इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेस (IPS) ची उपकंपनी स्थापन केलीये. त्यांच्या कॅनेडियन ऑपरेशन्सचे मुख्यालय ओटावा येथे आहे, जिथे कंपनीचे कार्यालय १० हजार चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. नुकतेच त्यांनी कॅनडात विस्तार करण्याची घोषणा केली होती. यामध्ये ७ हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. २०२४ पर्यंत ही संख्या ८ हजारांवर जाईल.

टीसीएस,विप्रोचाही मोठा व्यवसाय
दुसरीकडे भारतीय आयटी कंपनी टीसीएस आणि विप्रोचाही कॅनडात मोठा व्यवसाय आहे. विप्रो लिमिटेड टोरंटोमध्ये विप्रो एडब्ल्यूएस लाँच पॅड सेंटर चालवते. हे सेंटर कॅनडाच्या लोकांना क्लाऊड सोल्युशन देते. तर टीसीएसचा अमेरिका आणि कॅनडामध्ये मोठा व्यवसाय आहे. यापूर्वी महिंद्रा समूहानं आणि जेएसडब्ल्यूनं कॅनडाला मोठा झटका दिलाय.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले. भारतानं त्यांच्या आरोपांचं खंडनही केलं. यानंतर दोन्ही देशांमघ्ये तणाव वाढलाय.

Web Title: Mahindra Jindal strikes If Infosys Wipro take a big decision what will happen to Canada Justin Trudeau khalistan nijjar death comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.