उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहनी वेगवेगळे ट्विट करत असतात. सध्या त्यांच एक ट्विट व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी चंद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अभिनंदन करताना त्यांचे एक मोठे स्वप्न शेअर केले आहे. आनंद महिंद्रा यांना त्यांच्या कंपनीची नवीन थार-ई चंद्रावर उतरलेले पाहायचे आहे.
लागा तयारीला...या आठवड्यात येणार 4 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या डिटेल्स...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा अॅनिमेटेड व्हिडीओ फक्त १० सेकंदांचा असून, यात चंद्राचा पृष्ठभाग दिसत आहे. चंद्राच्या तळाशी एक लँडर उभा आहे आणि हळू हळू त्याचे दार उघडते आणि महिंद्रा अँड महिंद्राची नवीन थार-ई आतून खाली उतरल्याचे दिसत आहे.
महिंद्रा आणि महिंद्राच्या Mahindra Electric ने गेल्या महिन्यात Futurscape या जागतिक कार्यक्रमात Vision Thar-E इलेक्ट्रिक SUV चे अनावरण केले. ५ दरवाजे असलेली थार आगामी काळात इलेक्ट्रिक अवतारात येईल आणि एक्सप्लोर द इम्पॉसिबल फिलॉसॉफीसह अनावरण केलेल्या थार-ईची डिझाइन अप्रतिम आहे.
१० सेकंदाचा हा अॅनिमेशन व्हिडीओ शेअर करताना, आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये चंद्रयान-3 च्या यशाबद्दल अगोदर इस्रोचे आभार मानले आहेत. यासोबत त्यांनी लिहिले की, 'आमच्या महत्त्वाकांक्षेला उड्डाण दिल्याबद्दल इस्रोचे आभार. भविष्यात एके दिवशी, आपण विक्रम आणि प्रज्ञान यांच्यासोबत थार-ई चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना पाहू! त्याच्या खास स्वप्नाशी संबंधित ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो यूजर्सनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेले इस्रोचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावरून सातत्याने महत्त्वपूर्ण माहिती पाठवत आहेत, मात्र, आता त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत स्लिम मोडमध्ये ठेवण्यात आले आहे.