नवी दिल्ली - महिंद्र कंपनीने जुन्या कारच्या खरेदीसाठीचे नवे शोरुम उघडली आहेत. आता या नव्या शोरुमचा देशभरात विस्तार होत आहे. महिंद्रा फर्स्ट चॉईस कंपनीने किंमत आणि वेळ या सर्वांची बचत करणारी देशातील पहिले इन्स्टासर्व्ह कार देखभाल सुविधा पुण्यात सुरू केले. आता, देशभरात या आऊटलेटचा विस्ता होत आहे. स्वत: आनंद महिंद्र यांनी Yes म्हणून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ग्राहकांच्या आग्रही मागणीनंतर महिंद्रा कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
महिंद्रा फर्स्ट चॉईसने पुण्यातून आपल्या आऊटलेटची सुरुवात केली होती. आता, देशभरातून या आऊटलेटची मागणी वाढत आहे. जुन्या गाड्या खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तर, आपली गाडी विकून नवी गाडी घेणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिंद्राने फर्स्ट चॉईस व्हील्सने एकाच दिवसात 75 नवीन आऊटलेट सुरू केली आहेत. देशभरात आणखी 1100 नवीन स्टोअर उघडण्यात येणार असल्याचे अॅटोकार प्रोफेशनल या ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं होतं. त्यास, आनंद महिंद्रा यांनी यस म्हणत दुजोरा दिला आहे. @MFCWL हे त्यावर काम करत आहे, असेही महिंद्रा यांनी सांगितलंय.
सेकंडहँड कारना अधिक मागणी
मंदी असो व नसो सेकंडहँड कार नव्या कारपेक्षा अधिक विकल्या जातात, असे सांगण्यात येते. कारण, नव्या कार खरेदीसाठी आपली कार विकायची, आणि कार नसलेले व्यक्तीही जुनी कार घेण्यासाठी इच्छुक असतात. त्यामुळे, सेकंडहँड कारना मागणी आहे.