Join us  

चहाचा दर्जा कायम राखा

By admin | Published: July 16, 2016 2:59 AM

आपल्या चहाचा दर्जा कायम राखा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दार्जिलिंग चहा निर्यातदारांना केले आहे

दार्जिलिंग : आपल्या चहाचा दर्जा कायम राखा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दार्जिलिंग चहा निर्यातदारांना केले आहे. दार्जिलिंग टी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रपतींनी हे आवाहन केले. याप्रसंगी बोलताना मुखर्जी म्हणाले की, देशाच्या निजोजनबद्ध आर्थिक विकासात चहाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्या चीननंतर भारत चहाचा दुसरा मोठा उत्पादक देश आहे. केनिया आणि श्रीलंका यासारखे आणखी काही देश चहाचे उत्पादन करतात. तरीही या सर्व चहांमध्ये दार्जिलिंगच्या चहाचे विशेष महत्त्व आहे. पारखी नजर असलेल्या लोकांच्या दृष्टीने तर या चहाचे महत्त्व आणखीच जास्त आहे. दार्जिलिंगचे हे ब्रँड नाव, गुणवत्ता निर्यातदारांनी जपायला हवी.