Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिन्याला फक्त 1 हजार रुपये जमा करुन मिळवा 2 कोटी, जाणून घ्या गणित...

महिन्याला फक्त 1 हजार रुपये जमा करुन मिळवा 2 कोटी, जाणून घ्या गणित...

make 1 crore by SIP: छोट्या-छोट्या गुंतवणुकीतूनही मोठा परतावा मिळवता येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:11 PM2024-02-22T19:11:09+5:302024-02-22T19:12:18+5:30

make 1 crore by SIP: छोट्या-छोट्या गुंतवणुकीतूनही मोठा परतावा मिळवता येतो.

make 1 crore by SIP : Just invest 1 thousand rupee and get 2 crores in return, know the math... | महिन्याला फक्त 1 हजार रुपये जमा करुन मिळवा 2 कोटी, जाणून घ्या गणित...

महिन्याला फक्त 1 हजार रुपये जमा करुन मिळवा 2 कोटी, जाणून घ्या गणित...

make 1 crore by SIP : बहुतांश मध्यमवर्गीयांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो. यासाठी ते बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. अनेकांना असे वाटते की, 1-2 हजार रुपये गुंतवून मोठा फंड मिळवता येत नाही. पण, छोटी बचत करुनही मोठा फंड मिळवणे शक्य आहे. फक्त यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात, पण त्यातून कोणतेही मोठे आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येत नाही. मात्र, थोडीशी जोखीम पत्करुन म्युच्युअल फंडद्वारे तुम्ही मोठा परतावा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कमाईतील काही रक्कम दरमहा SIP मध्ये गुंतवावी लागेल. 1000-2000 रुपये गुंतवणे फार मोठी गोष्ट नाही. अगदी 20-25 हजार रुपये पगार असलेला व्यक्तीही एवढी रक्कम बाजुला काढून ठेवू शकतो.

जाणून घ्या गणित...
समजा तुम्ही 20 वर्षांसाठी SIP मध्ये दरमहा रु. 1000 गुंतवले आणि त्यावर 12% वार्षिक परतावा मिळाला, तर तुम्हाला 20 वर्षांनंतर एकूण रु. 9,99,148 (सुमारे 10 लाख) मिळतील. या 20 वर्षांमध्ये तुम्हाला फक्त 2,40,000 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्हाला या गुंतवणुकीवर 15% परतावा मिळाला तर तुम्हाला रु. 15 लाख (रु. 15,15,995) पेक्षा जास्त मिळेल आणि जर 20 टक्के परतावा मिळाला, तर 20 वर्षांनी एकूण 31,61,479 रुपये जमा मिळतील.

समजा तुम्ही 30 वर्षांसाठी SIP मध्ये दरमहा रु. 1000 गुंतवणूक केली, तर तुम्हाला बंपर परतावा मिळू शकतो. 30 वर्षांनंतर दरमहा 1000 रुपयांच्या SIP वर 12 टक्के दराने एकूण 35,29,914 रुपये मिळतील. तर, 15% परतावा मिळाल्यास रु. 70 लाख आणि 20 टक्के परतावा मिळत असेल तर 30 वर्षांनंतर एकूण 2,33,60,802 रुपये (2 कोटींहून अधिक) मिळू शकतात. विशेष म्हणजे, या 30 वर्षांमध्ये गुंतवणूकदाराला फक्त 3 लाख 60 रुपये जमा करावे लागतील. दरम्यान, तुम्हाला मिळणारे पैसे त्या-त्या वेळस मिळणाऱ्या व्याजावर अवलंबून असतील.

(टीप: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: make 1 crore by SIP : Just invest 1 thousand rupee and get 2 crores in return, know the math...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.